Ø अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड गहू 15 किलो, तांदूळ 20 किलो, साखर 1 किलो मिळणार
Ø प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो मिळणार
Ø एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजने अंतर्गत सुद्धा धान्य मिळणार
Ø अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना 1 किलो डाळ मिळणार
चंद्रपूर,दि. 1 मे: जिल्ह्यामध्ये माहे मे 2020 मध्ये योजना निहाय अन्नधान्य वाटप परिमाण ठरलेले आहे. या परिमाणानुसार जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वाटप होणार आहे.अशी माहिती एका प्रसिद्धीपत्रकात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत प्रति कार्ड 2 रुपये प्रति किलो दराने गहू 15 किलो, 3 रुपये प्रति किलो दराने तांदूळ 20 किलो तर 20 रुपये प्रति किलो दराने साखर 1 किलो मिळणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 2 रुपये प्रति किलो दराने गहू 3 किलो, 2 रुपये प्रति किलो दराने तांदूळ 2 किलो मिळणार आहे.
या व्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना या दोन्ही योजनेच्या रेशन कार्ड धारकांना प्रति मानसी 5 किलो तांदुळ मोफत म्हणजेच एका कार्डात 4 व्यक्ती असतील तर त्यांना 20 किलो तांदुळ मोफत मिळेल तसेच माहे मे -2020 महिण्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशनकार्डवर 1 किलो डाळ (चनाडाळ/तुरडाळ यापैकी जी उपलब्ध असेल ती) मोफत मिळणार आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमीत धान्य हे दर महिन्याप्रमाणे वरील दराप्रमाणे विकत घ्यावे लागेल व ते धान्य घेतल्यानंतर त्यांना 1 किलो दाळ व तांदुळ मानसी 5 किलो प्रमाणे मोफत मिळणार आहे.
उर्वरीत सर्व केशरी कार्ड धारकांना माहे मे महिन्यात प्रति मानसी 3 किलो गहु रुपये 8 प्रति किलो व 2 किलो तांदुळ रुपये 12 प्रमाणे त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदविले आहे त्याच दुकानातुन मिळेल.
केंद्र शासनाने एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजने अंतर्गत काही राज्या सोबत आंतरराज्य पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करुन दिली असुन त्यात प्रामुख्याने तेलंगना, आंध्रप्रदेश, गुजरात, राज्यस्थान, उत्तरप्रदेश व बिहार या राज्याचा समावेश असुन कोविड-19 मुळे त्या राज्यातील अडकलेल्या किंवा इकडे राहत असलेल्या रेशन कार्डधारकांना महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणच्या रेशन दुकानातुन धान्य घेण्याची मुभा असल्याने अशा परराज्यातील ज्या लोकांकडे त्यांचे रेशनकार्ड असेल त्यांना चंद्रपुर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातुन माहे मे, 2020 मध्ये धान्य वितरीत करण्यात येईल. याबाबत सर्व संबंधीत लोकांनी तसेच सर्व रास्तभाव दुकानदारानी नोंद घ्यावी.
कोवीड-19 कोरोना विषाणुचे प्रादुर्भावामुळे जिल्हयात शासनस्तरावर व जिल्हाधिकारी, चंद्रपुर यांनी काही निर्बंध घातले असुन त्यानुसार जिल्हयातील सर्व रास्तभाव दुकाने ही जिल्हाधिकारी यांनी ठरवुन दिलेल्या वेळेत म्हणजेच सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेतच उघडे ठेवून कार्डधारकांना लाभार्थ्यांना धान्य वाटप करायचे आहे. केंद्र शासनाचे सुचनेनुसार माहे मे,2020 महिन्यात धान्य वाटप करतांना ईपॉस मशिनवर प्रत्यक्ष कार्डधारकांचा लाभार्थ्याचा अंगठा लावायचा आहे. त्यानुसार ज्याचे नाव रेशनकार्डात आहे व आधार क्रमांक नोंदलेला आहे.अशाच व्यक्तीने धान्य घेण्यासाठी दुकानात जायचे आहे. दुकानदारांनी धान्य घेण्यास येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याकरीता हात धुण्याकरीता साबण व पाण्याची व्यवस्था करायची आहे.
कार्डधारकांनी दुकानात धान्य घेतेवेळी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असुन मास्क घालणे आवश्यक आहे. धान्याचे वितरण जरी 3 तारखेपासुन सुरु होणार असले तरी सर्व दुकांने ही दररोज उघडी राहणार असल्याने ग्राहकांनी एकाच दिवशी दुकानात गर्दी करु नये. तसेच ज्यांचेकडे रेशनकार्ड नाही अशा व्यक्तीनी उगाचच चौकशी करण्याकरीता रास्तभाव दुकानात त्रास देवु नये त्यांना काही चौकशी करायची असल्यास संबंधीत तहसिल कार्यालयाकडे किंवा प्रसिध्द केलेल्या हेल्पलाईन क्रमाकांवर सपंर्क साधवा. जिल्हयातील सर्व दुकानदारांना त्यांचे दुकानात नोंदलेला कार्डधारकांचे प्रमाणातच धान्य वितरीत केल्या जाते. त्यामुळे रेशनकार्ड नसणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने दुकानदाराना धान्याची मागणी करु नये किंवा त्यांचेवर दबाव आणु नये. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्किन यांनी दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment