Search This Blog

Monday, 5 January 2026

7 जानेवारी पासून चाचा नेहरू बाल महोत्सव


7 जानेवारी पासून चाचा नेहरू बाल महोत्सव

         चंद्रपूरदि. 05 :  चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल करण्यात येणाऱ्या अनाथनिराधारनिराश्रीत ज्यांना काळजी व संरक्षणाची गरज आहेअसे बालक व विधी संघर्षग्रस्त बालकेबालसंगोपन योजनेचे लाभार्थी तसेच शाळांमध्ये शिकत असलेले सर्वसामान्य बालके यांच्यामध्ये एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता 7 ते 9 जानेवारी 2026 रोजी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदर जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे उद्घाटन विनय गौडा यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील 12 शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळइंडोर खेळ तथा सांस्कृतिक स्पर्धाखो-खोकबड्डीधावणेबुद्धिबळकॅरमवक्तृत्वनिबंधचित्रकलावादविवादरांगोळीनृत्यगायननक्कल आणि एकांकिका आदी स्पर्धेकरीता विद्यार्थ्यांना भाग घेता येणार आहे. बक्षीस 9 जानेवारी 2026 ला होणार असल्याचे जिल्हा महिला व बालविकास मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

००००००

बेलसणी येथील स्टील प्लांट उभारणीबाबत जिल्हाधिका-यांची अंतिम अधिसूचना प्रसिध्द


बेलसणी येथील स्टील प्लांट उभारणीबाबत जिल्हाधिका-यांची अंतिम अधिसूचना प्रसिध्द

चंद्रपूरदि. 05 : मिलियन स्टील्स प्रायवेट लिमिटेड कंपनीनागपूर यांनी मौजा बेलसणी येथे सर्वे नं. 382383384385389/1,  389/2390391392393379 व 380 या जागेवर उच्च क्षमतेचा स्टील प्रकल्प उभारणी करण्यासाठी नमूद सर्वे नंबर शासकीय पाणंद रस्ता स्थलांतर करून सर्व्हे नं.  382379390391392393380 व 381 च्या सीमेलगत पाणंद स्थानांतरण करून मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 21 अन्वये 23 सप्टेंबर 2025 रोजी प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करून 22 डिसेंबर 2025 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

सदर मसुदा संबंधित व्यक्तीकडून 19 नोव्हेंबर 2025 रोजी आक्षेप सादर केला. सदर आक्षेपावर 23 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी घेण्यात आली. परंतु आक्षेपकर्ता यांनी लेखी अर्ज करून आक्षेप मागे घेतला असल्यामुळे सदरचा आक्षेप गृहीत धरण्यात आला नाही. उपरोक्त आक्षेप व्यतिरिक्त इतर कोणतीही आक्षेप विहित मुदतीत प्राप्त झाला नसल्याने प्रारूप अधिसूचना मध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.

त्यामुळे सर्व्हे क्र. 382389390391392 व 393 च्या पश्चिमेकडील बाजुने असलेला व सर्व्हे क्र. 379 ते 381 च्या पुर्वेकडील बाजुने असलेला शेणगावकडे जाणारा पाणंद रस्ता स्थलांतरीत करण्यात आला असून सर्व्हे क्र. 381 च्या पूर्व-पश्चिम व त्यानंतर उत्तर- दिशेने वळून सर्व्हे क्र.  379 ते 381  च्या पश्चिम दिशेने आवेदकाच्या पूर्णतः शेतातून पाणंद रस्ता शेणगावकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याला मिळतोयाबाबतची अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी 1 जानेवारी 2026 रोजी प्रसिध्द केली आहे.

००००००

Friday, 2 January 2026

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

 

ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा होणार

चंद्रपूरदि. 02 : राज्य शासनाच्या निर्देशान्वये 15 जानेवारी हा दिवस ऑलम्पिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहेस्वतंत्र भारताचे पहिले ऑलम्पिक पदक विजेते महाराष्ट्राचे सुपुत्र दिवंगत खाशाबा जाधव यांचा जीवनातून नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळावेयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व शासनमान्य खाजगी शाळामहाविद्यालयविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयक्रीडा संघटना/असोशिएसनक्रीडा मंडळेक्रीडा अकादमीशासनाच्या क्रीडा योजनांचा लाभ/अनुदान मिळालेल्या सर्व संस्थाअन्य संस्था व मंडळे यांनी राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करावेअसे निर्देश प्राप्त झाले आहेत.

याअंतर्गत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व त्यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान या विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करावेप्रा.संजय दुधाने लिखित ऑलम्पिकवीर खाशाबा जाधव’ हे पुस्तक प्रत्येक शाळा महाविद्यालयांच्या ग्रंथालयात खेळाडूंना वाचनासाठी उपलब्ध असावेतक्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी रॅलीचे / मॅरेथान स्पर्धांचे आयोजन करावेशालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळासंदर्भातील नियमावलीआलिंपिक स्पर्धासोबतच अन्य महत्वाच्या स्पर्धात्यामधील यशस्वी खेळाडू व अन्य बाबी यांची प्राथमिक माहिती देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन तसेच ऑनलाईन संपर्क माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचा नामवंत खेळाडूंसोबत संवाद साधावा.

विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने व विजेत्यांना पुरस्कार वितरणआंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव,  क्रीडा क्षेत्रातील यशवंत खेळाडूप्रशिक्षक तसेच क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती यांच्या उपस्थितीत नवोदित खेळाडूशालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनीपालकक्रीडा प्रेमीनागरिक यांच्यासोबत क्रीडा क्षेत्रातील करीअर संधीबाबत परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करावेयशस्वी क्रीडा विषयक उपक्रम तसेच क्रीडा सुविधांनी युक्त क्रीडा संकुलअकादमी संस्था यांना भेटी देणे व आपल्या स्तरावर क्रीडा विषयक अभिनव उपक्रम राबविण्यात यावे व अहवाल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला सादर करावाअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.

००००००

सरळसेवेतील लिपिक टंकलेखक पदांच्या भरतीकरीता 9 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

सरळसेवेतील लिपिक टंकलेखक पदांच्या भरतीकरीता 9 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूरदि. 02 :  सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक (गट-सरळसेवा पदभरती जाहिरात 12 ऑक्टोबर 2025 व शुध्दीपत्रक डिसेंबर 2025 नुसार आपल्या विभागाच्या संकेतस्थळावर अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरतीसाठीची वेब लिंक देण्यात आली आहेपरंतु सैनिक कल्याण विभागाचे संकेतस्थळ तांत्रिक कारणाने 26 डिसेंबर 2025 पासून निष्क्रीय झाल्याने इच्छूक उमेदवार वेबलिंकपर्यंत पोहचू शकत नाहीततरी उमेदवारांनी अर्ज भरण्याकरीता https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/३२७८६/९६१७३/Index.html  या Web Link  QR code चा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावे. 9 जानेवारी 2026 संध्याकाळी 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहेसदर वेब लिंक किंवा QR Code मध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास विभागाच्या dswpune@gmail.com या ई-मेल आयडीवर तात्काळ ई-मेल करून वरील वेब लिंक मागविण्यात यावीअसे सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

००००००

Thursday, 1 January 2026

वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होण्यास मदत







वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात कमी होण्यास मदत

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ

चंद्रपूरदि. 01 : रस्ते अपघातात होणारे मृत्यु हे मानवनिर्मित आहेअपघातांची संख्या आणि त्यात होणारे मृत्यु आपण नक्कीच कमी करू शकतोमात्र त्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहेत्यामुळे प्रत्येक व्यक्तीसमाजशासन आणि प्रशासन मिळून जिल्ह्यात अपघातांची संख्या कमी करू याअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयवाहतूक नियंत्रण शाखा आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने जनता महाविद्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियान – 2026 चा शुभारंभ करतांना ते बोलत होतेयावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमहानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेशअतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडेप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरेएस.टीमहामंडळाच्या विभागीय नियंत्रक स्मिता सुतवणेमहाविद्यायाचे प्राचार्य डॉआशिष महातळे आदी उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व वाढले आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेआज रस्त्यांची लांबी आणि रुंदी वाढली असून त्यावर वाहनांची संख्यासुध्दा मोठ्या प्रमाणात वाढली आहेत्यामुळे अपघातही वाढलेयात कुणी जखमी होतात तर कुणाला जीव गमवावा लागतोभारतात दरवर्षी रस्ते अपघातात मृत्यु पडणा-यांची संख्या दीड लाखांच्यावर आहेहे मृत्यु आपण नक्कीच रोखू शकतोवाहतुकीचे नियम पाळले नाही तर अपघातांची संख्या वाढतेत्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहेरस्त्यावर अतिजलद जाणे टाळावेआपले जीवन अमुल्य असून 1 – 2 मिनिटांमध्येसुध्दा आपला जीव जाऊ शकतोत्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आपले मित्रपरिवारातील सदस्य व इतरांना वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करावीजेणेकरून आपला जीव सुरक्षित राहू शकेलअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणालेइतर कोणत्याही रोगापेक्षा अपघातात मृत्यु होणा-यांची संख्या जास्त आहेरस्त्यावर सुरक्षित वाहन चालविणेही आपली जबाबदारी आहेकेवळ दंड आकारणे हे प्रशासनाचे ध्येय नाही तर जिवाची सुरक्षा महत्वाची आहेअसे त्यांनी सांगितलेमहानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश म्हणालेरस्ता सुरक्षा ही आपली जबाबदारी आहेलोकांमध्ये जनजागृती करण्यासाठीच प्रशासनामार्फत असे उपक्रम राबविले जातातलोकांचा सहभाग वाढला तरच रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी होईल.

अतिरिक्त पोलिस अधिक्षक म्हणाले, 2024 पेक्षा 2025 मध्ये अपघात आणि त्यात होणा-या मृत्युची संख्या 7 टक्क्यांनी कमी झालीवाहन चालवितांना स्वयंशिस्त पाळली तर अपघातांची संख्या कमी होईलअपघात झाला तर टोल फ्री क्रमांक 108 किंवा 112 वर त्वरीत कॉल करावाविभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे म्हणाल्यापरिवहन महामंडळाच्यावतीने सुध्दा रस्ता सुरक्षा अभियान राबविले जातेबसमध्ये विनातिकिट कुणीही प्रवास करू नयेएस.टी.चे तिकीट म्हणजे आपला 10 लाखांचा विमा असतोएसटीच्या अपघातात अपंगत्व आले तर 75 हजार ते 5 लक्ष रुपयांपर्यंत मदत दिली जातेअसेही त्यांनी सांगितलेयावेळी प्राचार्य डॉमहातळे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.

रस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ व्हावी –किरण मोरे

प्रास्ताविकात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे म्हणालेआजचे विद्यार्थी हे देशाचे जबाबदार नागरिक आणि वाहन चालविणारे सुध्दा आहेतरस्ते अपघात हे मानवनिर्मित आहेरस्त्यावर स्वयंशिस्त पाळली तर आपण चांगले आयुष्य जगू शकतोप्रशासनाच्या वतीने संपूर्ण वर्षभर रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येतेरस्ता सुरक्षा ही सामाजिक चळवळ करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन त्यांनी केले.

अपघातात प्राण वाचविणा-या जीवनदुतांचा सन्मान : अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना त्वरीत रुग्णालयात नेण्यासाठी मदत करणा-या जीवनदुतांचा यावेळी सन्मान करण्यात आलायात अफरोज नासीर पठाणदीपक सावरकरजयकांत थोरातअमित कोसुरकरराकेश आमनेयोगेश देशमुखसुरज ढोणेबापुजी पवारकिशोर कोटरंगे यांच्यासह किशोर ठाकरेअभिलाषा भगत या विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तकाचे विमोचन करण्यात आलेयावेळी रस्ता सुरक्षा संदर्भात व मतदानाबाबत शपथ घेण्यात आलीकार्यक्रमाचे संचालन सहायक मोटार वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांनी तर आभार श्रीमती बेग यांनी मानले.

००००००