Search This Blog

Wednesday, 20 November 2019

सोयाबीन विक्रीसाठी शासनाकडून १५ डिसेंबरपर्यत मुदतवाढ जिल्हा प्रशासनाकडून पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता

चंद्रपूर दि. १८ नोव्हेंबर : सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्यास्तव देण्यात आलेली मुदत वाढून देण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्हा प्रशासन मार्फत करण्यात आलेल्या या मागणीला मान्यता देण्यात आली असून मूग उडीद व सोयाबीन नोंदणीसाठी आता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            शासकीय खरेदी केंद्रांवर सोयाबीन विकण्यासाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदत ही 15 नोव्हेंबर पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. तथापिजिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे मागणी केली होती. आज झालेल्या गट शेती बैठकीत जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांनी देखील या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे मागणी केली होती. या बैठकीत उंच जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यानुसार आता मुदतवाढ मिळाली आहे.
            राज्य शासनाच्या सहकारपणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 2019 - 20 च्या हंगामामध्ये हे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मुगउडीद व सोयाबीन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांची होती. पाऊस लांबल्यामुळे अनेकांना सोयाबीन काढता आले नाही. त्यामुळे शासकीय खरेदीचा दिनांक वाढविण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. यासंदर्भात 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहकार व पणन विभागामार्फत यापूर्वी जारी केलेल्या हमी भावानुसार मूग उडीद व सोयाबीन खरेदीसाठी आता 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात असल्याचे आदेशात जाहीर केले आहे. यापूर्वी १५ सप्टेंबर २०१९  ते १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हमीभावाने मुंगउडीद व सोयाबीन खरेदी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले होते.तथापिअनेकांचे सोयाबीन शेतातच असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. या आदेशाने आता पुढील महिनाभर शासकीय दरात खरेदी केली जाणार आहे.
0000

Wednesday, 6 November 2019

आदिवासी विद्यार्थ्यांनी मोफत स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कौशल्य विकास विभागात 27 नोव्हेंबर पर्यंत करता येईल अर्ज
            चंद्रपूर दि. 6 नोव्हेबर आदिवासी उमेदवारांना  शिपाई  लिपिक  ग्रामसेवक तलाठी अशा वर्ग-व वर्ग-पदाकरिता  घेतलेल्या  जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची पूर्वतयारी करून देण्याकरिता आदिवासी  उमेदवारांकरिता  कौशल्य  विकास रोजगार व उद्योजगता माहिती व मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर येथे  स्पर्धा  परीक्षा पूर्व  प्रशिक्षण  दिनांक  डिसेंबर  2019 ते 1 5 मार्च 2020 पर्यंत  असे साडे तीन महिने कालावधीचे प्रशिक्षण दिनांक डिसेंबर 2019 पासून सुरू होणार आहे.
               प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना  दरमहा रुपये हजार विद्यावेतन देय राहील या प्रशिक्षण कालावधीत  खालील  अटीची  पूर्तता करणाऱ्या अनु जमाती प्रवर्गातील आदिवासी उमेदवारांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत अर्ज खाली पत्त्यावर सादर करावेत. अर्जात पूर्ण नावपत्तादूरध्वनी क्रमांकमोबाईल क्रमांक जन्मतारीख शैक्षणिक पात्रता जात व प्रवर्ग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता केंद्राची नोंदणी क्रमांक इत्यादी बाबीच्या उल्लेख करावा. सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. अर्ज करण्याकरिता एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे.
             मुलाखत इंटर वेल दिनांक 28 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येईल व    निवड यादी सिलेक्ट लिस्ट नुसार दिनांक 29 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रशिक्षणाची अटी उमेदवार अनु जमाती आदिवासी प्रवर्गातील असावाउमेदवाराचे किमान वय १८वर्ष व ३८ वर्षांपेक्षा कमी असावे. उमेदवार किमान एच एस सी परीक्षा उत्तीर्ण असावा उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रामध्ये शाळा सोडल्याचा दाखलाजातीचा दाखलाकिंवा जात वैधता प्रमाणपत्रमार्कशीटएसएससी एचएससी पदवीआधार कार्डजिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राची नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर यांनी कळविले आहे
0000000

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज 15 नोव्हेबर 2019 पर्यत महाडीबीटी ऑनलाईन पोर्टलवर सादर करण्याचे आवाहन


चंद्रपूर दि. 6नोव्हेबर :जिल्हयातील सर्व कनिष्ट वरीष्ट व व्यावसायिक बिगरव्यावसायिक, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य व शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे लिपीक यान कळविण्यात येते की,सन 2019-20 या वर्षापासून समाज कल्याण विभागाच्या केंद्र व राज्य पुरस्कार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती,परीक्षा शुल्क,शिक्षण शुल्क,विद्यावेतन,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृती या योजना महाडीबीटी या ऑनलॉईन प्रणालीमधून राबविण्यात येत आहेत.
तरी ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया या पुर्वीच सुरु झालेली आहे. तसेच ऑनलॉईन अर्ज करण्याचा अंतिम 15 नोव्हेबर 2019 पर्यत एस.सी.ओ.बी.सी.विजाभज, वि.मा.प्र.प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज भरणे आवश्यक आहे.याबाबत सर्व महाविद्यालयांनी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्यास्तरावर सूचना देण्यात याव्या.तसेच महाविद्यालयांनी सदर दिनांकापर्यत ऑनलॉईन प्राप्त अर्ज तापसण करुन सर्व कागदपत्रे योग्य असल्याची खात्री करुन पात्र अर्ज या कार्यालयाकडे फॉरवर्ड करावे, महाडीबीटी यंत्रणेवरुन ऑनलॉईन शिष्यवृत्ती अर्ज या कार्यालयास सादर करताना विद्यार्थ्यांनी ॲडमिशन स्लीप,प्रतिज्ञापत्र,टि.सी.वडील हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र,गॅप सर्टिफिकेट अपलोड केले आहेत यांची खात्री करावी,असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, विभाग चंद्रपूर यांनी कळविले आहे.
000000000

Wednesday, 23 October 2019

जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या तत्परतेने दुर्गापूर येथील मतदान पथकांना मिळाला दिलासा

गैरसमजातून नादुरुस्त व राखीव ईव्हीएम मशीनवर उमेदवारांनी घेतला आक्षेप
पथकांना अडविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल निवडणूक आयोगाला दिली माहिती
शांतता व सलोखा राखल्याबद्दल प्रशासनाने मानले आभार
चंद्रपूर दि २२ ऑक्टोबर : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील दुर्गापुर येथील मतदान केंद्रावरून मूल येथील उपविभागीय केंद्राकडे घेऊन जाणाऱ्या नादुरुस्त  व राखीव ईव्हीएम मशीनवरून काल रात्री निर्माण झालेला तणाव जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या प्रसंगावधानाने निवळला. रात्री उशिरा निवडणूक आयोगाला यासंदर्भात माहिती कळविण्यात आली असून सर्व मतदान यंत्रे व निवडणूक कागदपत्रे सुरक्षित असल्याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
         काल मतदानाच्या दिवशी दुर्गापूर येथील मतदान कक्षावरून बाहेर पडलेली क्षेत्रीय अधिकारी डी.जी. मेश्राम झोन क्रमांक १८ यांच्या जीप क्रमांक एम.एच. १८ एस १७०९ यांच्या वाहनासह सर्व निवडणूक ताफा रात्री उशिरा मूल येथे पोहोचल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत सादर करण्यात आला आहे.
            क्षेत्रीय अधिकारी श्री.डी.जी. मेश्राम यांच्या वाहनातील राखीव व नादुरुस्त झालेल्या मतदान यंत्राच्या संदर्भात काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडेवंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री. राजू झोडे व त्यांच्या समर्थकांना गैरसमज झाला होता. त्यामुळे या ठिकाणी जमा झालेल्या जमावाने मतदानानंतर मूल येथे जाणाऱ्या मतदान पथकांना अडविण्याचा प्रयत्न केला होता.
             घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली. वरील उमेदवारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी ज्या मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त केला त्या नादुरुस्त व राखीव यंत्रांचे क्रमांक नोंद करून देण्यात आले. तसेच या संदर्भात आक्षेप असल्यास निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरिक्षकांसमक्ष खात्री करून घेण्याचे सांगितले.जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेतील राखीव व नादुरुस्त ईव्हीएम मशीन बाबतची माहिती दिली. तसेच मतदान झालेले यंत्र अन्य वाहनात सुरक्षित असल्याची खात्री करून दिली. त्यांनी घटनास्थळावर भेट देऊन उमेदवार व समर्थकांची समजूत काढल्यामुळे रात्री उशिरा वाहनातील सर्व मतदान यंत्रे सहाय्यक निवडणूक अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासह बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या मूल येथील मुख्यालयात रात्री रवाना करण्यात आले.
            यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल व दाखवलेल्या संयमाबद्दल आभार मानले आहे.
            तसेच काल निवडणूक प्रक्रिया झालेल्या यंत्रांना कोणताही धोका नसून ते सर्व सीलबंद आहेत. त्यामध्ये नोंदविलेली मते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भातील कोणत्याही अफवांना बळी पडू नये तसेच यासंदर्भात कोणतीही अफवा पसरविणाऱ्याना थारा देऊ नयेअसे आवाहन करण्यात आले आहे.
0000

दिव्यांग ठरले लोकशाहीचे खरे शिलेदार

चंद्रपूर जिल्ह्यातील 95.71 टक्के दिव्यांगानी केले मतदान
चंद्रपूर, 22 ऑक्टोबर: चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचा मतदान प्रक्रियेतील सहभाग अचंबित करणारा ठरला. जिल्ह्यातील हजार 639 दिव्यांग मतदारांपैकी हजार 311 दिव्यांग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचे तेच खरे शिलेदार ठरले. जिल्ह्यातील तब्बल 95.71 टक्के दिव्यांगानी मतदान केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध सुविधा पुरवण्याचे नियोजन आखले होते. या नियोजनाला चंद्रपुर महानगरपालिका प्रशासनाचे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार, 80 वर्षावरील जेष्ठ नागरिकगर्भवती स्त्रियाप्रसूत स्त्रिया या मतदारांकरिता अनेक सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये व्हीलचेअरअंध मतदाराकरिता ब्रेल बॅलेट पेपरअंशता अंध मतदाराकरिता मॅग्नेफाईन शीटपिण्याचे पाणीवाहन व्यवस्था इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांच्या मदतीकरता स्वयंसेवक नेमले होते. निवडणूक आयोगामार्फत  प्रशासनाने पुरलेल्या या सुविधांना दिव्यांग बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला व दिव्यांग मतदारांची टक्केवारी 95.71 पर्यंत पोहचवली. त्यामध्ये विधानसभा क्षेत्रातील अस्थिभंग असलेले हजार 149 मतदार, 803 अंध मतदार, 433 अंशता अंध मतदार, 1926 इतर दिव्यांग मतदार यांनी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला.
            तसेच 16 हजार 291 दिव्यांग मतदारगर्भवती स्त्रियाप्रसुत स्त्रिया व 80 वर्षापुढील जेष्ठ नागरिक नागरिकांनी वाहतूक सुविधांची मागणी केली होती. त्यातील 7311 दिव्यांग, 2527 गर्भवती व प्रसुत स्त्रीयांना तर 8787 ज्येष्ठ नागरिकांना असे एकूण 14626 मतदारांना वाहतुकीची सुविधा पुरवण्यात आल्या. दिव्यांग मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी काही मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग मतदारांनाही प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचे मनोबल वाढवले.
000000