Search This Blog

Monday, 24 January 2022

15 फेब्रुवारी पर्यंत तुर खरेदी व नोंदणीस मुदतवाढ


 15 फेब्रुवारी पर्यंत तुर खरेदी व नोंदणीस मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 24 जानेवारी: हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड, एफसीआयच्या वतीने तुर खरेदीसाठी दि. 20 डिसेंबर 2021 पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली होती. प्रत्यक्षात दि. 28 डिसेंबर 2021 पासून खरेदी सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे.

शासनाने शेतकऱ्यांची तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणीची मुदतवाढ दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून नोंदणी व खरेदी वाढ होण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगिरवार यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment