Search This Blog

Sunday 2 January 2022

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 


पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर दि.2 जानेवारी : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार, दि.3 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10:15 वाजता ब्रह्मपुरी येथे आगमन व पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय, ब्रह्मपुरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10:30 वाजता नेवजाबाई हितकारणी मुलांची शाळा, ब्रह्मपुरी येथे मेंदूज्वर-जापनीज एन्सेफेलायटीस लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगण बोंडेगाव रोड, येथे नगरपरिषद ब्रह्मपुरी अंतर्गत स्विमिंग पूल व बगीचाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11:30 वाजता नगरपरिषद ब्रह्मपुरीच्या वतीने गांधीनगर येथील दलित वस्ती अंतर्गत नाल्या व रस्ते बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित.

दुपारी 12 वाजता संत रविदास चौक,विद्यानगर ब्रह्मपुरी येथील दलित वस्ती अंतर्गत नाणी व रस्ते बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 12:30 वाजता शांतीनगर, देलनवाडी येथे आमदार निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित. दुपारी 12:45 वाजता देलनवाडी प्रभाग क्र. 8 मध्ये दलित वस्ती अंतर्गत रस्ते व नाल्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 1:15 वाजता स्वयंदीप पतसंस्थेच्या स्थलांतरित झालेल्या नवीन वास्तूचे लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2 वाजता शांतीनगर, ब्रह्मपुरी येथील बुद्ध विहार उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित. दुपारी 2:30 वाजताचा वेळ राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे तालुक्यासह, शहरातील विविध विकास कामासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांची आढावा बैठक.

सायंकाळी 4 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

 मंगळवार, दि. 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृह येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान अंतर्गत ज्ञानोत्सव-2022 कार्यक्रमाचा शुभारंभ व शाळेला साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित.

दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कोविड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12:30 वाजता अर्थसंकल्प 2022 मध्ये विविध विकास कामे समाविष्ट, मंजूर करण्याकरिता तसेच सुरू असलेल्या विकास कामासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 2:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्ह्यातील जबराणजोत संदर्भात वनविभाग, महसूल विभागासह संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment