Search This Blog

Monday 17 January 2022

नगर पंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश


नगर पंचायत निवडणुकीदरम्यान मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश

      चंद्रपूर, दि. 17 जानेवारी : जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती आणि सिंदेवाही – लोनवाही नगर पंचायतीमध्ये मंगळवार दि. 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार आहे. सदर मतदान / मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने मतदानाअगोदरचा दिवस 17 जानेवारी, मतदानाचा दिवस 18 जानेवारी आणि मतमोजणीचा दिवस 19 जानेवारी 2022 रोजी संबंधित नगर पंचायत हद्दीतील सर्व मद्य व बिअर तसेच ताडी विक्री अनुज्ञप्त्या तिनही दिवस बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

०००००००

No comments:

Post a Comment