Search This Blog

Thursday 13 January 2022

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा भरारी पथकाद्वारे 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

 तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा

भरारी पथकाद्वारे 34 पान टपरीवाल्यांवर कारवाई

चंद्रपूर, दि. 13 जानेवारी  :  राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू नियंत्रण भरारी पथकमार्फत कोटपा कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या शहरातील 34 पान टपरीवाल्यावंर कारवाई करण्यात आली. यात जटपुरा गेटरामनगरवरोरा नाकाजनता महाविद्यालय परिसर येथील 22 पानटपरीधारकांना प्रत्येकी 200 रुपये तर उर्वरीत 12 पानटपरीधारकांना प्रत्येकी 400 रुपये याप्रमाणे दंड आकारण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणीमहाविद्यालयहॉस्पिटलशाळा परिसरात असलेल्या पानठेल्यावर आरोग्य विभागअन्न  व औषध प्रशासन विभाग, पोलिस विभाग यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली. जास्तीत जास्त लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामाची जाणीव होऊन नवीन पिढी तंबाखूच्या आहारी जाणार नाही, हा या कारवाईचा मुख्य उद्देश आहे.       

भरारी पथकामध्ये जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकरअन्न निरीक्षक श्री. सातकरपोलिस निरीक्षक श्री. मूळे, पोलीस उपनिरीक्षक श्री.दराडेरामनगर पोलिस स्टेशन व त्यांची चमू तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत येणारे समुपदेशक मित्रंजय निरंजनेतुषार रायपुरेअतुल शेंद्ररेयांनी मोलाची कामगिरी केली.

००००००

No comments:

Post a Comment