Search This Blog

Friday, 21 January 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन 50 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना

 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिन 50 मान्यवरांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता

चंद्रपूर, दि. 21 जानेवारी: प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते दि. 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मैदान, पोलीस मुख्यालय, चंद्रपूरच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यावर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम 50 मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्याच्या सुचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.

इतर शासकीय कार्यालयातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम शासन सूचनेनुसार सकाळी 8.30 वाजेपूर्वी किंवा 10 वाजता नंतर आयोजित करावा. सदर ध्वजारोहण कार्यक्रमास जास्तीत जास्त 50 मान्यवर उपस्थित राहतील. तसेच कोरोना वर्तणूक विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment