Search This Blog

Monday 17 January 2022

जिल्ह्यात सोमवारी 95 कोरोनामुक्त तर 179 नवे बाधित

 


जिल्ह्यात सोमवारी 95 कोरोनामुक्त तर 179 नवे बाधित

Ø  ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 1580

चंद्रपूरदि. 17 जानेवारी :  कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असून जिल्ह्यात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या पंधराशेच्या वर पोहचली आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 95 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 179 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. जिल्ह्यात सोमवारी मृत्यू संख्या शून्य आहे.

आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 111चंद्रपूर 18बल्लारपूर 29भद्रावती 2ब्रह्मपुरी 3सावली 1पोंभूर्णा 3राजुरा 2चिमूर 7वरोरा 2तर कोरपना    येथे 1 रुग्ण आढळून आले असून नागभीडसिंदेवाहीमुलगोंडपिपरीजिवती व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 90 हजार 906 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 781 झाली आहे. सध्या 1580 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 21 हजार 33 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 28 हजार 607 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1545 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावीव प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment