Search This Blog

Wednesday, 1 March 2023

4 मार्च रोजी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन

4 मार्च रोजी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन

Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

Ø जिल्ह्यातील नागरीकमत्स्यसंवर्धक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 1 : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी व विविध मत्सव्यवसाय विषयक शासकीय उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक क्षेत्रातील भागधारकांना मिळण्याकरीता 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मत्स्य महोत्सव व कार्यशाळा एन. के. अॅक्वाकल्चरमत्स्यबीज केंद्रपेढंरीमक्ताता.सावली येथे पार पडणार आहे. राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर महोत्सव होणार आहे.

या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धकमत्स्यविक्रेतामत्स्य बिजोत्पादकमत्स्यखाद्य निर्मिती कंपनीमत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित येणार आहेत. यावेळी नवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदानतांत्रिक मार्गदर्शनउपलब्ध संधीचा शोधविविध शासकीय योजनारोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता आदी उद्दिष्टे समायोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरीकमत्स्यसंवर्धक व शेतकरी यांनी या महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मेळाव्यातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. बळकटे यांनी केले आहे.

०००००

27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू


27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू

Ø चंद्रपूरराजुराचिमूरगडचांदूर व वरोरा या पाच खरेदी केंद्रास मंजुरी

चंद्रपूरदि.1 : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात हंगाम 2022-23 मध्ये चना खरेदीसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार 27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

चना खरेदी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी ई- 7/12चालू खाते असलेले बँक पासबुकआधार कार्डऑनलाइन पिकपेरा व आठ-अ प्रमाणपत्र सोबत आणावे व ते स्कॅन करून शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये नोंदणी होणार असल्याने रोज घेतलेले अर्ज त्याचदिवशी भरणा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चना विकता येणार आहे.

यासाठी पाच खरेदी केंद्रास मंजुरी देऊन खरेदी केंद्र जोडण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर खरेदी केंद्रास-पोंभुर्णा व सावली तालुका,  राजुरा खरेदी केंद्रास-बल्लारपूरगोंडपिपरी व मुल तालुका,  चिमूर खरेदी केंद्रास-ब्रह्मपुरीसिंदेवाही व नागभीड तालुका,  गडचांदूर खरेदी केंद्रास-कोरपना व जिवती तालुकावरोरा खरेदी केंद्रास- भद्रावती तालुका आदी तालुके शेतकरी चना खरेदी नोंदणीसाठी  केंद्रास जोडण्यात आले आहे. तरीशेतकऱ्यांनी चना खरेदीकरीता नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.

०००००

5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन


5 ते 11 जुलै कालावधीत अग्नीवीर सैन्य भरती रॅलीचे आयोजन

Ø 15 मार्च ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख

चंद्रपूरदि.1 :  भारतीय सैन्य दलामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवयुवकांचे एक सैनिक म्हणून सर्वात जास्त योगदान आहे. सैन्य भरती कार्यालयनागपूर यांच्यामार्फत सैन्य भरतीच्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नवयुवकांसाठी दि. 5  ते 11 जुलै 2023 या कालावधीत बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील 10 जिल्ह्यांकरिता अग्निवीर रॅली आयोजीत करण्यात आली आहे.

भरतीस इच्छुक उमेदवारांनी सैन्य भरतीच्या अटीनियमपात्रता व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच स्वतःचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे. ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 15 मार्च 2023 आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन नंतर मिळणाऱ्या हॉल तिकीट शिवाय कोणत्याही उमेदवारास सैन्य भरतीच्या मैदानात प्रवेश मिळणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालयनागपूर यांच्या 0712-2558020 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी  सैन्य दलात भरती होण्यासाठी या संधीचा परिपूर्ण लाभ घ्यावाअसे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दीपक लिमसे यांनी केले आहे.

००००००

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड



पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड

            चंद्रपूरदि.1 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरीयेथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.         

याप्रसंगीएमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठाजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.पी. मेहंदळेनेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गहाणेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात इलेव्हेट रिअल इस्टेट चंद्रपूरवैभव एंटरप्रायजेस नागपूरपरम स्किल ट्रेनिग इंडिया औरंगाबादजयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपूरीउषा कन्स्लटंसी नागपूरनवकिसान बायोप्लॅणेटिक लिमीटेडएलअॅंडटी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग इस्टीटयुट पनवेल मुंबईउत्कर्ष स्मॉल फायनांस बॅक नागपूरआक्स फर्स्ट एचआर डेस्क चंद्रपूर स्टॉप कॅन्सर मिशन नागपूर विविआर फायंनेशिअल सर्विसेसचंद्रपूर आदी कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एकुण 362 उमेदवारांनी नोंदणी केली.  त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड कंपनीमार्फत अप्रेंटिस ट्रेनीमोटार मेकॅनिक मार्केटिग एक्झ्यिक्युटीवटेलीकॉलरअसिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळया पदाकरीता प्राथमिक निवड करण्यात आली असून पूढील निवड प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. रुगंठा म्हणालेचंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी असून या जिल्हात कॉपरगोल्ड,  ग्रॅनाइट आदी खनीजे मुबलक प्रमाणात आहे. हा जिल्हा कृषी सधन असून  सुजलामसुफलाम असल्याचे ते म्हणाले. श्री. मेंहेदळे यांनी उमेदवारांना एकत्रित येवून उद्योजक बनावे याबाबत मार्गदर्शन केले. तर सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले.            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती दिली.  

प्रास्ताविक मुकेश मुंजनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सिद्धांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी,औद्योगिक प्रशिक्षण संस्थाब्रम्हपूरीचे  कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००

जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी


जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी

Ø शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच चंद्रपूरसावलीराजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील आयटीआयमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 1 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांना कौशल्य विकासरोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूरसावलीराजुरा व ब्रह्मपुरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सर्वसाधारण योजना सन 2022 23 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण व कोर्सेस सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण व कोर्सकरीता वयोमर्यादा 15 ते 45 वर्षे आहे तर शैक्षणिक पात्रता 10 वी व आयटीआय पास असणे अनिवार्य आहे. कोर्सेस मध्ये इलेक्ट्रिशियनब्युटी थेरपीस्टअसिस्टंट इलेक्ट्रिशियनएलईडी लाईट रिपेयर टेक्निशियनफोर व्हीलर सर्विस टेक्निशियन आदी कोर्सेसचा समावेश आहे.

अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थेसोबत संपर्क करावा व मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००००