Search This Blog

Wednesday, 1 March 2023

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड



पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड

            चंद्रपूरदि.1 : जिल्हा कौशल्य विकासरोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्रचंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरीयेथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.         

याप्रसंगीएमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठाजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.पी. मेहंदळेनेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गहाणेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात इलेव्हेट रिअल इस्टेट चंद्रपूरवैभव एंटरप्रायजेस नागपूरपरम स्किल ट्रेनिग इंडिया औरंगाबादजयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपूरीउषा कन्स्लटंसी नागपूरनवकिसान बायोप्लॅणेटिक लिमीटेडएलअॅंडटी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग इस्टीटयुट पनवेल मुंबईउत्कर्ष स्मॉल फायनांस बॅक नागपूरआक्स फर्स्ट एचआर डेस्क चंद्रपूर स्टॉप कॅन्सर मिशन नागपूर विविआर फायंनेशिअल सर्विसेसचंद्रपूर आदी कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एकुण 362 उमेदवारांनी नोंदणी केली.  त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड कंपनीमार्फत अप्रेंटिस ट्रेनीमोटार मेकॅनिक मार्केटिग एक्झ्यिक्युटीवटेलीकॉलरअसिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळया पदाकरीता प्राथमिक निवड करण्यात आली असून पूढील निवड प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. रुगंठा म्हणालेचंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी असून या जिल्हात कॉपरगोल्ड,  ग्रॅनाइट आदी खनीजे मुबलक प्रमाणात आहे. हा जिल्हा कृषी सधन असून  सुजलामसुफलाम असल्याचे ते म्हणाले. श्री. मेंहेदळे यांनी उमेदवारांना एकत्रित येवून उद्योजक बनावे याबाबत मार्गदर्शन केले. तर सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले.            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या  जिल्हा समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती दिली.  

प्रास्ताविक मुकेश मुंजनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सिद्धांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी,औद्योगिक प्रशिक्षण संस्थाब्रम्हपूरीचे  कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment