बल्लारपूर मतदार संघातील रस्ते विकासासाठी 75 कोटी रुपये निधी
Ø पालकमंत्र्यांनी मानले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार
मुंबई / चंद्रपूर, दि.15 : बल्लारपूर मतदार संघातील पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल मतदार जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.
विपुल खनिज संपत्ती आणि वनसंपदा निसर्गाकडून लाभलेल्या बल्लारपूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टीने महाराष्ट्राच्या यावर्षीच्या अर्थ संकल्पात उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांनी अतिशय संवेदनशीलपणे विचार केला आहे. मतदार संघातून जाणाऱ्या राज्यमार्ग मजबुतीसाठी 41 कोटी तसेच प्रमुख जिल्हा मार्गांच्या विस्तारासाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ग्रामीण भागातील रस्ते विकासाकरिता 20.10 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण 75 कोटी रुपयांची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अर्थसंकल्पात बल्लारपूरकरीता करण्यात आली आहे.
याशिवाय हायब्रीड अन्युटी प्रोग्राम अंतर्गत जवळपास 800 कोटी रुपये किंमतीच्या 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पांचा डीपीआर तयार करण्यासाठी 1 कोटी 71 लाख रुपयांची सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तरतूद करण्यात आल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
००००००
No comments:
Post a Comment