Search This Blog

Wednesday 15 March 2023

15 ते 19 मार्च दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता

 15 ते 19 मार्च दरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता

चंद्रपूर, दि. 15 : चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून 15 ते 19 मार्च या कालावधीत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या कालावधीत जिल्ह्यात एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह  मेघगर्जना आणि वादळी वारा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

No comments:

Post a Comment