Search This Blog

Tuesday 14 March 2023

क्रीडा स्पर्धेसोबतच खेळाडूंना मोफत टायगर सफारी





क्रीडा स्पर्धेसोबतच खेळाडूंना मोफत टायगर सफारी

Ø वनमंत्र्यांनी दिला होता शब्द

Ø 180 जणांनी लुटला ताडोबात व्याघ्र पर्यटनाचा आनंद

चंद्रपूर, दि. 14 : विसापूर (ता. बल्लारपूर) येथे नुकत्याच राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. चंद्रपूरात आल्यावर ताडोबातील टायगर सफारी केली पाहिजे, असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच राज्यभरातून स्पर्धेसाठी आलेले खेळाडू आणि त्यांच्या पालकांना मोफत टायगर सफारीचे नियोजन करण्यात येईल, असा शब्द स्पर्धेचे उद्घाटन करतांनाच राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. त्यानुसार वन विभाग आणि स्थानिक पदाधिका-यांनी क्षणाचाही विलंब न लावता खेळाडू व पालक अशा 180 जणांची मोफत टायगर सफारी घडवून आणली. व्याघ्र पर्यटनाचा आनंद त्यांच्या चेह-यावर झळकत होता 

राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात 11 ते 13 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. येथे आलेला प्रत्येक खेळाडू हा वाघासारखाच आहे. त्यामुळे वाघांना वाघाचे दर्शन घडविणे, हे आपले कर्तव्य आहे, असे वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी भाषणाच्या सुरवातीलाच घोषित केले. त्यानुसार वन विभागाने चार मोठ्या बसेस व 12 जिप्सी गाड्यांचे नियेाजन केले. 12 मार्च रोजी सकाळच्या पहिल्या सत्रात 90 जण तर दुपारच्या सत्रात 90 अशा एकूण 180 जणांना ताडोबा दर्शन घडविण्यात आले. यात 150 खेळाडू व 30 पालकांचा समावेश होता.

राज्यभरातून स्पर्धेसाठी चंद्रपुरात आलेले गरीब घरचे असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना संपूर्ण आयुष्यात टायगर सफारीची संधी प्राप्त झाली नसती. ही संवेदनशीलता ओळखून वनमंत्र्यांनी खेळाडू आणि पालकांसाठी मोफत टायगर सफारी घडवून आणली. सफारी दरम्यान सर्वांनी टायगर सायटिंगसुद्धा अनुभवली तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये संपूर्ण खेळाडू आणि पालकांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी वनमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आणि धन्यवाद सुद्धा मानले.

००००००

No comments:

Post a Comment