Search This Blog

Friday 17 March 2023

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच विनामुल्य

                             



                विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच विनामुल्य

Ø कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्रात तिसऱ्या सत्राचा समारोप

चंद्रपूरदि. 17 : आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता माहिती व  मार्गदर्शन केंद्र कार्यरत आहे. या केंद्रात स्पर्धा पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे या वर्षातील तिसऱ्या सत्राचा समारोपीय कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला केंद्राच्या प्रमुख तथा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारेकनिष्ठ कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी विजय गराटेकेंद्रातील कर्मचारी संजय राठोडशिक्षकवृंद श्रीमती डोंगरेश्री. भगतश्री. गौरकार आदी उपस्थित होते.

यावेळी वाघमारे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासप्रयत्नांचे सातत्यकठोर परिश्रम तसेच ध्येय निश्चित करून यश मिळविता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेविषयी प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. प्रशिक्षण सत्राच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात आले होते. कविता वाचन स्पर्धानिबंध स्पर्धा व अंतिम परीक्षा यामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना केंद्रातर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येणारा चार स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा संच विनामूल्य वाटप करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रशिक्षणार्थी आचल नागोसे हिने तर आभार सोनी उईके या प्रशिक्षणार्थींने मानले.

००००००

No comments:

Post a Comment