Search This Blog

Friday, 17 March 2023

वरोरा ते वणी मार्गावरील पाटाळा पुलाच्या बांधकामादरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी

 वरोरा ते वणी मार्गावरील पाटाळा पुलाच्या बांधकामादरम्यान

सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी

Ø 19 व 20 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत राहणार वाहतुक बंद

Ø पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे पोलिस विभागाचे आवाहन

चंद्रपूर, दि. 17 : वरोरा ते वणी या राष्ट्रीय महामार्गावरील पाटाळा पुलाचे काम सुरू असल्याने पुलाच्या बांधकाम दरम्यान 19 मार्च रोजी रात्री 8 वाजतापासुन ते 20 मार्च 2023 रोजीचे सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीस पुर्णतः बंदी घालण्यात येत असुन वाहतूक वळविण्याबाबत आदेशीत करण्यात येत आहे.

पोलि स्टेशन, माजरी हद्दीतील वरोरा ते वणी या मार्गावरील पाटाळा येथे नविन निर्माणाधिन पुलाचे बांधकाम करणे प्रस्तावित आहे. सदर पुलाच्या बांधकामादरम्यान जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होवून अडचण निर्माण होवू नये. तसेच अपघातासारखे प्रकार घडून जिवीत व वित्तहानी होवू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासंदर्भात नव्याने उपाययोजना करण्याचे आवश्यक झाले आहे.

या पर्यायी मार्गाचा करा अवलंब:

वरोरा कडून वणीकडे जाण्यासाठी वरोरा-भद्रावती-साखरवाही फाटा-घुग्गुस-वणी या मार्गाचा अवलंब करावा. तसेच वणीकडून वरोराकडे जाण्यासाठी वणी-घुग्गुस-साखरवाही फाटा-भद्रावती-वरोरा या मार्गाचा अवलंब करावा. व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment