Search This Blog

Thursday, 16 March 2023

चंद्रपूर जिल्ह्यातील चणा उत्पादकतेत आता 1206 किलोपर्यंत वाढ


 

चंद्रपूर जिल्ह्यातील चणा उत्पादकतेत आता 1206 किलोपर्यंत वाढ

Ø पालकमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित

चंद्रपूर, दि. 16 : सन 2022-23 मध्ये पुरेसा पाऊस पडल्याने जमिनीत असलेला ओलावा आणि चणा (हरभरा) पिकासाठी अनुकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे यंदा जिल्ह्यात चणा पिकाच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. असे असले तरीशासनाने मागील पाच वर्षांपूर्वी ठरवून दिलेल्या प्रति हेक्टरी 750 किलो अशा अल्प स्वरूपाच्या उत्पादकतेमुळे सरकारी चणा खरेदी केंद्रांवर अल्प उत्पादकतेत चणा विकल्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरीत चणा खाजगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत होतात्यामुळे चणा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त होते.

ही गंभीर बाब जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देवराव भोंगळे यांच्या कानावर टाकल्यानंतर भोंगळे यांनी सदर बाब पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देत चंद्रपूर जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने योग्य उत्पादकता लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याची आवश्यकता आहेअशी आग्रही विनंती केली.

त्यानुसार श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाची चालू वर्षाकरिता सुधारीत अंदाजित पुर्वानुमानानुसार चणा (हरभरा) पिकांची अंदाजित उत्पादकता ही प्रती हेक्टरी 1206 किलो इतकी घेण्यात आली असल्याने त्यानुसारच शासनाने जिल्ह्याकरीता खरेदी परवानगी द्यावीअशी मागणी शासन दरबारी लावून धरली आणि त्यासंदर्भाने सातत्याने पाठपुरावा केला. पालकमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चणा (हरभरा) उत्पादकता हेक्टरी 750 किलो वरून 1206 किलो करण्यासाठी मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील चणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

००००००

No comments:

Post a Comment