मातोश्री वृद्धाश्रमात महिला दिन
चंद्रपूर, दि. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. सुचिता धांडे, वेकोली येथील सरिता मरुगेशन, डॉ. दिव्या मरुगेशन यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृध्दाश्रमातील वृध्द महिलांसोबत संवाद साधला.
यावेळी डॉ. धांडे म्हणाल्या, आज सामाजिक परिस्थिती बदलली आहे. कधीकाळी अनिच्छेने वृद्धाश्रमाची वाट धरणारे वृध्द आज वृद्धाश्रमाची वाट भरताना बघायला मिळते. येथे असणारे सर्व जण एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी असतात, असे त्यांनी सांगितले.
मुलींच्या आयटीआयमध्ये विविध स्पर्धा : शासकिय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, (मुलींची) येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर आयटीआय मुलींची असल्यामुळे रांगोळी स्पर्धा, आनंदी मेळावा आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये संस्थेतील कार्यरत सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या प्राचार्या कल्पना खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे गटनिर्देशक श्री. डाबरे, सुनील मेश्राम, शिल्पनिदेशक वर्षा कुर्वे, रवी सोरते, सुषमा बोकडे, सुषमा मस्की, मंगला खणके, कांचन कुंटेवार, सुधा शेंडे, अमित काळे, प्रभात होकम, स्मीता देशमुख, योगेश शामकुळ, मनीषा कोहाड, सुनिल समर्थ, मामा लोणारे, निता ब्राम्हणे आदींनी सहकार्य केले. तत्पुर्वी, कार्यक्रमाची सुरूवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
०००००००
No comments:
Post a Comment