ईट राईट चॅलेंज-2 उपक्रमात जिल्ह्याने पटकाविला राज्यात दुसरा तर देशात 63 वा क्रमांक
Ø केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरणाचा उपक्रम
चंद्रपूर, दि. 24 : नागरीकांना सुरक्षित व सकस अन्न उपलब्ध व्हावे व भारतीय नागरिकांमध्ये वाढत असलेले असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी ईट राईट इनेशिएटीव्ह (EAT RIGHT INITITATIVE) हा उपक्रम राबविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या उपक्रमात ईट राईट कॅम्पस, ईट राईट स्कुल, भोग (Blissful Hygienic Offering to God), प्लेस ऑफ वर्कशिप, फोर्टीफिकेशन डेमोस्ट्रेशन, मिलेट्स बेस्ड रेसीपी डेमोस्ट्रेशन आदी कार्यक्रमांचा अंतर्भाव केला आहे.
केंद्रीय अन्न सुरक्षा मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत भारतात ईट राईट चॅलेंज-2 उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमामध्ये चंद्रपूर जिल्ह्याने सहभाग नोंदविला होता. या उपक्रमात अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर या कार्यालयामार्फत चेजिंग फुड चॉईस मुद्यातील ईट राईट ईन पब्लिक प्लेस मुद्यांची पूर्तता करण्याकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणामार्फत जारी केलेले व्हिडीओज सिनेमागृहात प्रदर्शित करणे, विविध जिंगल्स तयार करून त्यास जनसामान्यांमध्ये अन्नपदार्थ विषयी जनजागृती होणेकरीता “रेडिओ” प्रसार माध्यमाद्वारे व्यापक प्रसिध्दी देणे, फोर्टीफाईड अन्नपदार्थ याबाबत सर्वसामान्य जनतेला ओळख पटवून देण्यासाठी फोर्टीफिकेशन डेमोंस्ट्रेशन नियोजन करणे, मिलेट्स बेस्ड रेसीपी डेमोस्ट्रेशन सादर करणे, शाळेत जनजागृतीपर कार्यक्रम तसेच, अन्न सुरक्षा सप्ताह राबविणे आदी उपक्रम अन्न व औषध प्रशासन कार्यालयामार्फत आयोजीत करण्यात आले होते.
औरंगाबाद जिल्ह्यास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यास राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असून देशात 63 वा क्रमांक मिळाला आहे. सदर उपक्रम अन्न सुरक्षा आयुक्त, मुंबई, जिल्हाधिकारी, चंद्रपूर, सहआयुक्त, नागपूर विभाग, नागपूर, यांच्या मार्गदर्शनात अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न), नि. दि. मोहिते यांनी पुढाकार घेऊन यशस्वी केला. हा उपक्रम यशस्वी होण्याकरीता अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी, जी. टी. सातकर, श्री. टोपले तसेच कार्यालयातील कर्मचारी, सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहारासाठी सल्लागार समितीमधील शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न), नितीन मोहिते यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment