27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी सुरू
Ø चंद्रपूर, राजुरा, चिमूर, गडचांदूर व वरोरा या पाच खरेदी केंद्रास मंजुरी
चंद्रपूर, दि.1 : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात हंगाम 2022-23 मध्ये चना खरेदीसाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार 27 फेब्रुवारीपासून चना खरेदीकरीता शेतकरी नोंदणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
चना खरेदी नोंदणी करताना शेतकऱ्यांनी ई- 7/12, चालू खाते असलेले बँक पासबुक, आधार कार्ड, ऑनलाइन पिकपेरा व आठ-अ प्रमाणपत्र सोबत आणावे व ते स्कॅन करून शेतकरी नोंदणी करणे आवश्यक आहे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये नोंदणी होणार असल्याने रोज घेतलेले अर्ज त्याचदिवशी भरणा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चना विकता येणार आहे.
यासाठी पाच खरेदी केंद्रास मंजुरी देऊन खरेदी केंद्र जोडण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर खरेदी केंद्रास-पोंभुर्णा व सावली तालुका, राजुरा खरेदी केंद्रास-बल्लारपूर, गोंडपिपरी व मुल तालुका, चिमूर खरेदी केंद्रास-ब्रह्मपुरी, सिंदेवाही व नागभीड तालुका, गडचांदूर खरेदी केंद्रास-कोरपना व जिवती तालुका, वरोरा खरेदी केंद्रास- भद्रावती तालुका आदी तालुके शेतकरी चना खरेदी नोंदणीसाठी केंद्रास जोडण्यात आले आहे. तरी, शेतकऱ्यांनी चना खरेदीकरीता नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment