जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी
Ø शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी तालुक्यातील आयटीआयमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 1 : जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक स्तरावर मोफत कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून त्यांना कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त होण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर, सावली, राजुरा व ब्रह्मपुरी येथे कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात येत आहे.
प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सर्वसाधारण योजना सन 2022 23 अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांकरिता विविध प्रकारचे प्रशिक्षण व कोर्सेस सुरू करण्यात येत आहे. या प्रशिक्षण व कोर्सकरीता वयोमर्यादा 15 ते 45 वर्षे आहे तर शैक्षणिक पात्रता 10 वी व आयटीआय पास असणे अनिवार्य आहे. कोर्सेस मध्ये इलेक्ट्रिशियन, ब्युटी थेरपीस्ट, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, एलईडी लाईट रिपेयर टेक्निशियन, फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन आदी कोर्सेसचा समावेश आहे.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता उमेदवारांनी संबंधित प्रशिक्षण संस्थेसोबत संपर्क करावा व मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment