Search This Blog

Thursday 16 March 2023

नाफेडच्या चना खरेदी शेतकरी नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

 नाफेडच्या चना खरेदी शेतकरी नोंदणीस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 16 : नाफेडतर्फे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात हंगाम 2022-23 मध्ये चना खरेदीस केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. शेतकरी नोंदणीसाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी चना खरेदी शेतकरी नोंदणी करण्यासाठी येताना, सोबत ई-सातबारा, चालू खाते असलेले बँक पासबुक, आधारकार्ड, ऑनलाइन पिकपेरा व आठ-अ, प्रमाणपत्र सोबत आणावे. शासनाने दिलेल्या कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी होणार असल्यामुळे रोजच्या रोज घेतलेले अर्ज त्याचदिवशी भरणा करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने चना विकता येणार आहे. तसेच कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार सुधारित जिल्हानिहाय प्रति हेक्टरी उत्पादकता 750 (किलो /हेक्टर)वरून सुधारित हेक्टरी उत्पादकता 1206 प्रती (किलो /हेक्टर) करण्यात आली आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment