Search This Blog

Friday 10 March 2023

नागरिकांनी अनधिकृत कंपन्यांमध्ये निधी गुंतवू नये

 

नागरिकांनी अनधिकृत कंपन्यांमध्ये निधी गुंतवू नये

Ø निधी गुंतवण्यापासून सावध राहण्याचे कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे निर्देश

चंद्रपूर, दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील काही निधी कंपन्यांनी किंवा परस्पर लाभ संस्थांनी कंपनी कायदा 2013 कलम 406 नुसार व त्याखालील नियमानुसार एनडीएच-4 अर्ज कार्पोरेट व्यवहार मंत्रालयास दाखल केले नाही. तसेच ज्या अनधिकृत निधी कंपन्यांनी एनडीएच-4 अर्ज दाखल केले आहे परंतु, त्यांचे एनडीएच-4 अर्ज केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून स्वीकारण्यात आलेले नाही, अशा अनधिकृत निधी कंपन्यांमध्ये नागरिकांनी निधी गुंतवू नये तसेच निधी गुंतवण्यापासून सावध राहण्याचे निर्देश केंद्र शासनाच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने दिले आहे.

यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील येहोवा यीरे बचत निधी लि. चंद्रपूर, संपदा अर्बन निधी लि. मूल व लोढीया गोल्ड निधी लि. ब्रह्मपुरी या निधी कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना कामकाज सुरू ठेवण्यापासून तसेच सदस्यांकडून निधी स्वीकारण्यापासून किंवा सर्वसाधारण जनतेला या कंपन्याचे सदस्य होण्यापासून प्रतिबंधित केले आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी कळविले आहे.

००००००००

No comments:

Post a Comment