राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम
Ø कानाच्या समस्या व काळजी या विषयावर मार्गदर्शन
चंद्रपूर, दि. 09 : राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत 1 ते 8 मार्च 2023 या कालावधीत विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहाचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाके, डॉ. किरण कानिरे, डॉ. सचिन बिलवने, डॉ. कापर्तिवार, ऑटोमॅटिक असिस्टंट रवींद्र घाटोळे, स्पीच इन्स्ट्रक्टर कोमल मोरे आदी उपस्थित होते.
डॉ. मंगेश गुलवाडे यांनी कानाचे आजार व काळजी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांनी कानाच्या समस्या व काळजी या विषयावर मार्गदर्शन करून या सप्ताहाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली. यामध्ये, कान, नाक व घसा तज्ञ डॉ. सचिन बिलवने यांची कानाच्या आजारासंदर्भात मुलाखत, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकारी यांचा जागतिक कर्णबधिरता जनजागृती संदर्भात वेबिनारचे आयोजन, ज्येष्ठ नागरिकांकरीता कान तपासणी शिबिराचे आयोजन, आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यशाळा, जागतिक कर्णबधिरता सप्ताहाच्या उद्घाटन सोहळा तसेच शासकीय परिचर्या प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे रांगोळी व चित्रकला स्पर्धा, कार्यशाळेचे आयोजन आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांच्या हस्ते दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.बिलवाने यांनी तर आभार कोमल मोरे यांनी मानले.
०००००००
No comments:
Post a Comment