पोलिस अहवाल अप्राप्त असल्यामुळे शस्त्र परवान्याचे नुतनीकरण प्रलंबित
चंद्रपूर, दि. 25 : जिल्ह्यातील दि. 31 डिसेंबर 2022 रोजी मुदत संपलेल्या 188 (आत्मसंरक्षणार्थ, बँक संरक्षणार्थ व कंपनी संरक्षणार्थ) शस्त्र परवानाधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात परवाना नुतणीकरणासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर केला. मात्र समोरच्या प्रक्रियेकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र नियम, 2016 चे नियम 14 अन्वये एस-4 यामध्ये अहवाल सादर करण्यास पोलिस विभागास कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने आजपर्यंत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून 13 शस्त्र परवान्याच्या नुतनीकरणाचे अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार 13 शस्त्र परवाने नुतनीकरण करून देण्यात आले आहे. उर्वरित 175 शस्त्र परवानाधारकांचे पोलिस अहवाल, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून अप्राप्त असल्याने सदर अर्जावर कार्यालयाचा निर्णय प्रलंबित आहे, असे अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी कळविले आहे .
०००००००
No comments:
Post a Comment