4 मार्च रोजी मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील संधी व उपक्रमांच्या माहितीसाठी मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन
Ø पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती
Ø जिल्ह्यातील नागरीक, मत्स्यसंवर्धक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 1 : मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध संधी व विविध मत्सव्यवसाय विषयक शासकीय उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिक क्षेत्रातील भागधारकांना मिळण्याकरीता 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता मत्स्य महोत्सव व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मत्स्य महोत्सव व कार्यशाळा एन. के. अॅक्वाकल्चर, मत्स्यबीज केंद्र, पेढंरीमक्ता, ता.सावली येथे पार पडणार आहे. राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर महोत्सव होणार आहे.
या महोत्सवामध्ये मत्स्य व्यवसायाच्या विकासाकरीता मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील भागधारक जसे मत्स्यसंवर्धक, मत्स्यविक्रेता, मत्स्य बिजोत्पादक, मत्स्यखाद्य निर्मिती कंपनी, मत्स्यपालन सहकारी संस्था व त्यांचे सभासद तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ एकाच छत्राखाली एकत्रित येणार आहेत. यावेळी नवीन तंत्रज्ञानाचे आदान प्रदान, तांत्रिक मार्गदर्शन, उपलब्ध संधीचा शोध, विविध शासकीय योजना, रोजगार निर्मिती तसेच बाजाराची उपलब्धता आदी उद्दिष्टे समायोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील नागरीक, मत्स्यसंवर्धक व शेतकरी यांनी या महोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मेळाव्यातील विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री. बळकटे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment