Search This Blog

Friday, 24 March 2023

टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना आहार कीट वाटप

 

टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना आहार कीट वाटप

चंद्रपूरदि. 24 : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारांदा येथे दालमिया सिमेंट कंपनी आणि दालमिया भारत फाउंडेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून क्षयरोग रुग्णाला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सकस आहार कीट वाटप करण्यात आली.

श्री. जॉन्सन हे कोरपना तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतअंगणवाडीजिल्हा परिषद शाळाप्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नारांदा येथे यांच्या हस्ते क्षय रुग्णाला सकस आहार कीट वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

सन 2025 पर्यंत संपूर्ण भारत टीबी मुक्त करायचा आहे. त्यामुळे  संशयित टीबी रुग्णांना शोधून त्यांचे आजाराचे निदान करून त्यांना उपचाराखाली आणणे सुरू आहे. तसेच उपचार कालावधीत त्यांना सकस प्रोटीनयुक्त आहार मिळावा, याकरीता समाजातील दानशूर लोकप्रतिष्ठित मंडळीलोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था ,औद्योगिक कंपनी यांच्यामार्फत सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी प्रत्येकी एका रुग्णाला दत्तक घेऊन आहार किट देण्याचा उपक्रम राबवल्या जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दालमिया सिमेंट कंपनी नारांदा यांनी त्यांच्या सीएसआर कार्यक्षेत्रातील सहा रुग्णांना दत्तक घेतले आहे व त्यातील एका रुग्णाला आहार कीट वाटप करण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे, कोरपना व जिवती तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभेवैद्यकीय अधिकारी डॉ. दीक्षा ताकसांडेडॉ.सुबोध गोडबोले, आरोग्य सहाय्यक श्री. टोंगेश्री.कन्नाकेश्रीमती मारोतकरऔषध निर्माण अधिकारी श्री. सावरकर व दालमिया भारत फाउंडेशनचे प्रशांत भिमनवार उपस्थित होते. कोरपना येथील क्षयरोग विभागाचे श्री.पारखी, श्री. हिरेमठ यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.

००००००

No comments:

Post a Comment