Search This Blog

Monday, 25 November 2024

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा

 

दत्तक प्रक्रियेकरीता संपर्क करा

Ø महिला व बालविकास कार्यालयाचे आवाहन

चंद्रपूरदि. 25 : ज्यांना नैसर्गिक पालकत्वापासून वंचित राहावे लागते, अशा नागरिकांसाठी आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. पालकत्व मिळण्याकरीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी आहे प्रक्रिया.

1) अनाथ बालक दत्तक घेणे  : यामध्ये अनाथपरित्याग केलेले आणि सोडून दिलेल्या  बालकांचा समावेश होतो. अशा बालकाचे संरक्षणजिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जाते. अशा बालकाचे संरक्षणपालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती, चंद्रपूरयांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांनाबालकल्याण समिती चंद्रपूर द्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक CARA (Central Adoption Resource Authority)  cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

2) नात्याअंतर्गत (रक्तातील नाती )/सावत्र दत्तक : बाल न्याय बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015  चे कलम  2(52)  नुसार दत्तक जाणाऱ्या मुलाचे काका- काकूमामा- मामीमावसा -मावशीआजी – आजोबा (आईकडील / वडीलांकडील) हे नात्यांतर्गत दत्तक  घेण्यास पात्र असतात. सावत्र दत्तक यामध्ये पती/ पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यासतसेच पती /पत्नी यापैकी एकाचे  मृत्यू झाल्याससदर व्यक्ती दुसरे  लग्न  करत असल्यास व त्याचे मुल/ मुली असतील, त्या मुलांना लग्न झालेल्या व्यक्तीचे नाव जोडण्याकरीता सावत्र दत्तक केल्या जाते. अशा दत्तक इच्छुक पालकांनी CARA (Central Adoption Resource Authority)  यांचे cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

 3)  प्रतिपालकत्व दत्तक घेणे : काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके बालकल्याण समिती चंद्रपुर यांच्या आदेशान्वये बालगृहात दाखल होतात. अशा बालकांना त्यांचे पालक बालकांचे पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा बालकांना 6 महिन्यापासून  भेटायला आले नाही, अशा बालकांना बाल कल्याण समिती द्वारे प्रतिपालकत्व तत्वावर पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा इच्छुक पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व  कुटुंबाचे प्रेम मिळण्यासाठी दत्तक देण्यास येते. यासाठी इच्छुक पालकांनी https://fcdcommpune.com/admin  या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी.

यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती SFCAC (Sponcership and Fostercare ApprovalCommittee) द्वारे पात्र ठरविल्यानंतर बालकल्याण समिती मार्फत बालकाचा ताबा देान वर्षकरीता पालन पोषण करण्यासाठी पात्र कुटुंबाकडे देण्यात येतो. बालकाचे नाव / आडनाव बदलण्याचा अधिकार पात्र कुटुंबाला राहत नाही व दोन वर्षानंतर बालक जर त्या कुटुंबात रुळले तर अशा बालकाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पालक  कोर्टामार्फत करु शकतो.

दत्तक प्रक्रिया जाणून घेणे व दत्तक प्रक्रियेकरिता नोंदणी विषयी जाणून घेण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला  भेट देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालाविकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा  बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.

००००

No comments:

Post a Comment