आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी व खरेदी सुरू
चंद्रपूर, दि. 2 : कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर व दि. महाराष्ट्र स्टेट का-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबई तर्फे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने, हंगाम 2024-25 मध्ये केंद्र शासनाच्या नाफेड/ एन.सी.सी.एफ मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत, सोयाबीन शेतमाल खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे सुरू आहे.
सोयाबीन नोंदणी करीता 1) शेतीचा चालू वर्षाचा खरीप सोयाबीन पिकपेरा नोंद असलेला ई-7/12 व नमुना 8 अ, 2) बँक पासबुक 3) आधारकार्ड 4) मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रांसह सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी, स्वत: कार्यालयात हजर राहून कृषी उत्पन्न बाजार समिती, चंद्रपूर येथे नोंदणी करून घ्यावी व शासकीय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा.
तसेच बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना पाणपोई, पिण्यासाठी पाणी, शेतमाल मोजण्यासाठी वेट ब्रिज काटा व ईलेक्ट्रानिक्स वजनकाटे, सी.सी.टिव्ही कॅमेरे इ. सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर येताना सोयाबीन शेतमाल व्यवस्थितरित्या साफ करून, वाळवून आणावा, जेणेकरून आद्रता मोजतांना 12 टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. बाजार समितीचा एस.एम.एस. आल्यानंतर शेतकरी बांधवांनी आपला सोयाबीन शेतमाल केंद्रावर विक्रीसाठी आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment