Search This Blog

Wednesday, 13 November 2024

15 नोव्हेंबर रोजी स्वीप अंतर्गत मॅराथॉन रॅलीचे आयोजन


 15 नोव्हेंबर रोजी स्वीप अंतर्गत मॅराथॉन रॅलीचे आयोजन

चंद्रपूर दि.13 : मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत असून शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.15 वाजता मॅराथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘माझे मत माझा अधिकार’‘होय मी मतदान करणारच’‘आपण सगळे मतदान करू या - लोकशाहीला बळकट करू या’ अशा विविध घोषवाक्यांसह 18 व 18 वर्षावरील सर्व स्त्री - पुरुष यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असून रॅलीद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.  मॅराथॉन रॅलीचे उ‌द्घाटन आझाद बगीचा येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर सदर रॅली गिरनार चौक ते पठाणपूरा गेट ते गांधी चौक ते जटपुरा गेट रोड ते परत आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप होईल. रॅलीत सहभागी विद्यार्थी/ नागरिकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे.

सदर रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थीनागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment