Search This Blog

Saturday 2 November 2024

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

 

निवृत्तीवेतन धारकांनी 30 नोव्हेंबरपूर्वी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

             चंद्रपूरदि. 2 :  निवृत्ती वेतनधारकांची दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधीत बँकेसह पाठविण्यात येणार असून त्यावर आपल्या नावासमोरील रकान्यात निवृत्ती वेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पुर्वी स्वत: उपस्थित राहून सदर यादीवर मोबाईल क्रमांकपॅन क्रमांकआधार क्रमांक नमुद करून स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याचे प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल. 

           तसेच जे निवृत्तीवेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात, त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे. खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आपण हयातीचा दाखला सादर करु शकता.

आपले पेन्शन खाते  असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे  हयात दाखला सादर करा. 1) https://jeevanpraman.gov.inया संकेतस्थळावर लॉगइन करा. 2) GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3) तुमचा आधार क्रमांक टाका. 4)  तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा. 5) तुमच्या जवळच्या  जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. 6) हयात दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करुन जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 7) काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. 

हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024  पर्यंत कोषागारास  प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बॅकेकडे पाठविले जाणार नाहीयाची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment