Search This Blog

Friday, 15 November 2024

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर









 मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर

Ø मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

चंद्रपूर, दि. 15 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण- तरुणी आणि नागरिकांनी सहभागी होऊन मतदार जनजागृतीचा संदेश दिला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयद्वारा मतदार जनजागृतीकरीता मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन आझाद बगीचा, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, रविंद्र भेलावे, महानगर पालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडगटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे, नायब तहसीलदार श्री. गाद्देवार व इतर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिनी मॅरॅथॉनला सुरुवात झाली. ‘माझे मत माझा अधिकार’‘होय मी मतदान करणारच’‘आपण सगळे मतदान करू या - लोकशाहीला बळकट करू या’ अशा विविध घोषवाक्यांसह चंद्रपूरकरांनी यात सहभाग नोंदविला.

जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत समारोप व विजेत्यांना पुरस्कार वितरण : सदर मॅरेथॉन आझाद बगीचा पासून गिरनार चौकगांधी चौकजटपुरा गेटला वळसा घालून गेल्यानंतर आझाद बगीचा या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. मिनी मॅरेथॉन मध्ये मुलेमुली व ज्येष्ठ नागरिक या तिन्ही गटातून प्रथमद्वितीयतृतीय क्रमांक प्राप्त धावपटुला 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपयाचा धनादेशसन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यांचा होता सहभाग : या रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच  जिल्हा परिषदमहानगरपालिकेचे शिक्षक, चंद्रपूर योग नृत्य परिवारफन ग्रुपपतंजली ग्रुपपोलीस भरती ग्रुपकराटे ग्रुपनेटबॉल ग्रुपयांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या टी शर्टटोपी परिधान करून मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला. सहभागी सर्व धावपटुंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांनी मानले. यावेळी मनपाचे प्रशासन अधिकारी श्री. नीत, निखिल तांबोळीअविनाश जुमडेअनिल दागमवारसुरेंद्र शेंडेप्रशांत मत्तेआत्राम सरगेडाम सर आदी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment