Search This Blog

Friday, 15 November 2024

14 ते 20 नोव्हेंबर पर्यंत अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन

 

14 ते 20 नोव्हेंबर पर्यंत अखिल भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन

            चंद्रपूरदि. 15 : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली दरवर्षी भारतीय सहकारी सप्ताहाचे आयोजन  करीत असते. यावर्षी सुध्दा 71 वा सह.सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेच्या वतीने राज्यात व जिल्ह्यात  सहकारी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षीच्या सह.सप्ताहाची मुख्य संकल्पना  विकसित भारताच्या पायाभरणीत  सहकारी संस्थांची भूमिका’ ही आहे.

            जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांनी आपल्या स्तरावर सहकारी सप्ताहात पदाधिकाऱ्यांनासभासदांना अवगत  करुन सहकारी सप्ताहात खालील दिन विशेषनूसार सभासद शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, सहकारी ध्वजारोहणवृक्षलागवड व परिसर स्वच्छता असे लोकाभिमुख कार्यक्रम राबवावे. सदर उपक्रम राबवितांना आचारसंहितेचे उल्लंघन  होणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावीअसे आवाहन सहाकार विभाग चंद्रपूर, जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूर तसेच सहकार प्रशिक्षण केंद्रचंद्रपूर द्वारे करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक : 14 नोव्हेंबर  रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाने हाती घेतलेल्या नवीन उपक्रमांच्या द्वारे सहकारी चळवळीचे  बळकटीकरण, 15 नोव्हेंबर रोजी सहकारात नवीनतातंत्रज्ञानसुशासन आणणे, 16 नोव्हेंबर रोजी उद्योजगतारोजगारआणि कौशल्यवृध्दीत  सहकारीतेची भूमिका, 17 नोव्हें. रोजी सहकारी उद्योजकतांचे  परिवर्तन, 18 नोव्हें. रोजी सहकारांतर्गत सहाकाराचे बळकटीकरण, 19 नोव्हेंबर रोजी महिलायुवक आणि दुर्बल घटकांसाठी सहकारिता आणि 20 नोव्हेंबर रोजी शाश्वत विकासाची उद्यिष्टे साध्य करणे आणि उत्तम जगाच्या   निर्मितीत सहकारीतेची भूमिका या विषयावर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जिल्हा सहकार विकास अधिकारी कार्यालयाने  कळविले आहे. ही एक बातमी करून घ्याल

००००००

No comments:

Post a Comment