Search This Blog

Wednesday, 13 November 2024

मतदानाची टक्केवारी वाढवा! आकर्षक बक्षीसे जिंका

 

मतदानाची टक्केवारी वाढवाआकर्षक बक्षीसे जिंका

Ø स्वीप अंतर्गत बीएलओकरीता जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

चंद्रपूर दिनांक 13 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कार्य करून त्या क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) विधानसभा क्षेत्रनिहाय आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहे.  स्वीप अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून बीएलओ करीता हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.  

विधानसभा निवडणूक कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राकरीता दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले होते, त्या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) जर लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षा 10 टक्के व त्यापेक्षा अधिक मतदान विधानसभा निवडणुकीत वाढविले तर अशा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) विधानसभा क्षेत्रनिहाय आकर्षक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जाहीर केले आहे.   

जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने सर्वच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ज्या बीएलओच्या क्षेत्रातील मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतदान झालेले आढळून येईल, त्यांची गुणानुक्रमे निवड करून प्रथमद्वितीयतृतीयचतुर्थ व पंचम असे पाच विजेते घोषित करून त्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासाच्या वतीने करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment