Search This Blog

Sunday, 10 November 2024

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई

 

पंतप्रधानांच्या दौ-यानिमित्त जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन उडविण्यास मनाई

Ø जिल्हाधिका-यांनी पारीत केले आदेश

चंद्रपूर,दि.10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 12 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे दौरा असून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित  राखणे तसेच अवकाशीय उपकरणाद्वारे नियोजित संभाव्य हल्ल्याची शक्यता रोखण्याकरीता  चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  विना परवाना व बेकायदेशीर रित्या ड्रोनचा वापर करण्यास मनाई आदेश पारीत करण्यात आला आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 च्या तरतुदीन्वये चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत  12 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 00.01 वाजतापासून 12 नोव्हेंबरच्या रात्री 24.00 वाजेपर्यंत विना परवाना व बेकायदेशिररित्या  ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सही व शिक्यानिशी  सदर आदेश पारीत करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment