9 नोव्हेंबर रोजी मतदान जनजागृतीसाठी सायकल रॅली
चंद्रपूर, दि. 7 : आगामी विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन चंद्रपूर द्वारे 9 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथून जटपूरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा समारोप महानगरपालिका येथील पार्कींग मध्ये करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment