ईव्हीएम वाहनांच्या दळणवळणासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
Ø न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा रस्ता इतर वाहनांसाठी बंद
चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपुर तहसील कार्यालय येथे 19 नोव्हेंबर 2024 रोजी (ई.व्ही.एम) E.V.M मशीन घेऊन जाण्याकरीता तसेच 20 नोव्हेंबर रोजी ईव्हीएम मशीन जमा करण्याकरीता बरेचसे वाहन या कार्यालयात येतात. सदर वाहनांचे आगमन व निर्गमन जिल्ह्याधिकारी कार्यालय मेन गेट समोरील रस्त्याने होणार असल्याने त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई पोलिस अधिनियम -1951 च्या कलम-33 (1) (ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाचे नियमनासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारन्वये, सदर रस्त्यावर रहदारी सुरळीत चालावी, रहदारीस कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये व जनतेला त्रास अगर गैरसोय होऊ नये म्हणून 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजतापासून 21 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजेपर्यंत न्यायालयाच्या मेन गेट पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मेन गेट पर्यंतचा डाव्या बाजुचा पुर्ण रस्ता हा ईव्हीएम मशीन घेवून जाणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व वाहनांना वाहतुकीकरीता बंद करण्यात येत आहे. सदरचे दोन्ही बाजुचे रस्ते हे ‘नो पार्कींग व नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर मार्गावार कोणत्याही नागरीकांनी आपले वाहने पार्कींग करु नये . तसेच हातठेले लावू नये, असे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी निर्गमित केले आहे.
ईव्हीएम मशिन घेऊन जाण्याकरीता व येणाऱ्या वाहनाकरीता खालीलप्रमाणे पार्कींगस्थळे घोषित करण्यात येत आहे.
1. नियोजन भवनच्या बाजुला पार्कींग ( छोटे वाहनांकरीता)
2. जिल्ह्याधिकारी कार्यालय मेन गेटच्या उजव्या बाजुला (बसेस व इतर मोठ्या वाहनांकरीता)
3. न्यायालयाच्या मेन गेट पासून ते जिल्हाधिकारी मेन गेट पर्यंत डाव्याबाजुला (बसेस व इतर मोठ्या वाहनांकरीता)
वरील निर्देशाचे पालन करुन जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आाहे.
००००००
No comments:
Post a Comment