Search This Blog

Friday, 29 November 2024

रब्बी हंगाम 2024 अंतर्गत अन्नधान्य, कडधान्य पिकांच्या पीकस्पर्धा

 

रब्बी हंगाम 2024 अंतर्गत अन्नधान्यकडधान्य पिकांच्या पीकस्पर्धा

चंद्रपूरदि. : पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांनामिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्तीमनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेलहा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

            रब्बी हंगाम 2024 मध्येही तालुकाजिल्हा व राज्य पातळीवर पीक स्पर्धा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारीगहुहरभराकरडई व जवस या पाच पिकासाठी पिकस्पर्धेंचे आयोजन करण्यात येत आहे.

1) पीकस्पर्धेतील पीके :  रब्बी पीके - ज्वारीगहूहरभराकरडई व जवस

2) पात्रता निकष :  स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावेजमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच  वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

3) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन 7/128- अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास ) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12  वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा

4) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीकस्पर्धेचा अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

5) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क  : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये राहील व  आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील.

बक्षिसाचे स्वरुप : तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे बक्षीस 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दूसरे 40 हजार आणि तिसरे बक्षीस 30 हजार रुपये आाहे.

येथे करा संपर्क : पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

उपरोक्त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावेअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

००००००

No comments:

Post a Comment