Search This Blog

Friday, 22 November 2024

मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज ! कर्मचा-यांचे प्रशिक्षण






 

मतमोजणीकरीता यंत्रणा सज्ज कर्मचा-यांचे प्रशिक्षण

Ø चंद्रपूरमध्ये सर्वाधिक 28 तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या

चंद्रपूरदि. 22 :  येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत.

            विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या : 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे.  71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि  7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत.  

            या ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारततहसील कार्यालयराजुरा येथे,  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालयचंद्रपूर येथेबल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालयप्रशासकीय इमारत मुल येथेब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतननागभीड रोडब्रम्हपूरी येथेचिमूर  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृहउपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समितीगोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

कर्मचा-यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.

००००००

No comments:

Post a Comment