Search This Blog

Monday, 18 November 2024

मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

 


मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू

चंद्रपूर दि.18 :  चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुन 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा 2023 च्या कलम 163 तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हान्यायदंडाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी निर्बंध लागू केले आहेत. सदर प्रतिबंधात्मक निर्बंध 18 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजता पासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत लागू असणार आहेत.  

या कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यास व सार्वजनिक प्रचार सभा आयोजनास बंदी राहणार असून मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असणे आवश्यक आहे. तसेच त्यावर कोणतेही चिन्हउमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव मुद्रीत करण्यावर बंदी असणार आहे. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांस बंदी राहणार असून मतदान केंद्रात मतदारउमेदवार व त्यांचे निवडणुक / मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच प्रवेश राहणार आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस मतदान केंद्रात प्रवेशावर बंदी असेल.

मतदारांना लाच देणेमतदारांवर गैरवाजवी दडपणमतदारांना धाकदपटशा दाखविणेतोतयेगिरी करणे यावर प्रतिबंध आहेत. तसेच मतदान केंद्राच्या 100 मिटर परीसरात प्रचार करण्यास बंदी राहणार आहे. मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर ने-आण करण्याच्या प्रथेस पायबंद घालण्यासाठी टॅक्सीखाजगी कारट्रक,

ऑटोरिक्शामिनी बसस्टेशन व्हॅनस्कुटरमोटार सायकल इत्यादी सर्व प्रकारच्या वाहनांवर बंदी राहणार असुन मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान केंद्राचे परीसरात भित्तीपत्रकेध्वजचिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करण्यास बंदी असणार आहे.

            ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली असेलअशी कोणतीही व्यक्ती त्याच्या सुरक्षा कर्मचा-यासह मतदार केंद्राच्या 100 मिटर परीसरात प्रवेश करणार नाही. तसेच अशी व्यक्ती मतदार असली तरी निव्वळ मतदान करण्याकरिता सुरक्षा कर्मचा-यासह मतदार केंद्र परिसरात ये-जा करण्यावर निबंध राहीलतथापीविशेष सुरक्षा व्यवस्था प्रदान केलेल्या व्यक्तीच्या विशेष सुरक्षा पथकास (Close Protection Team) शस्त्रांसह मतदान केंद्राचे केवळ दारापर्यंत संरक्षित व्यक्तीसोबत जाता येईल व एका वैयक्तिक सुरक्षा अधिका-यास शस्त्राचे प्रदर्शन न करता तसेच मतदान प्रक्रियेत कोणताही प्रकारे अडथळा न करता संरक्षित व्यक्तीस ( Protectee ) मतदान केंद्रात सोबत करता येईल.

ज्या व्यक्तिच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटल्यामुळे सरकारी सुरक्षा पुरविण्यात आलेली असेल किंवा त्या व्यक्तिकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तिस निवडणुक प्रतिनिधी वा मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंदी राहील. मतदान केंद्रात मतदानाचे दिवशी मोबाईल / स्मार्ट फोन / वायरलेस सेट इत्यादी नेण्यास प्रतिबंध राहील. मतदान केंद्राध्यक्ष / आचारसंहिता / कायदा व सुव्यवस्था पथक प्रमुख / निवडणुकीच्या कर्तव्यावरील सुरक्षा कर्मचारी यांना उक्त प्रतिबंध लागू राहणार नाही.

 निर्बंधाच्या कालावधीत या बाबींवर बंदी नाही :  सर्व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 पासून प्रचार बंद होत असला तरीघरोघरी प्रचारावर निर्बंधाच्या कालावधीत प्रतिबंध असणार नाही. परंतू 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल. दवाखान्याच्या गाड्याअॅम्बुलन्सदुधगाड्यापाण्याचे टँकर्सविदयुत विभाग / पोलिस / निवडणूक कर्मचारी यांच्या वाहनावर बंदी राहणार नाही. विहीत मार्गाने जाणा-या बस गाडयावर बंदी राहणार नाही. टॅक्सी इत्यादी वाहने बस स्टेशन / रेल्वे स्टेशन / हॉस्पीटल कडे जाणारी वाहने यावर बंदी राहणार नाही. दिव्यांग / आजारी व्यक्तिस मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणे-येणे करीता आजारी / दिव्यांग व्यक्तींच्या वाहनास बंदी असणार नाही, असे आदेशात नमुद आहे.

००००००

No comments:

Post a Comment