उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अर्ज करण्याचे आवाहन
Ø एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
चंद्रपूर, दि.21 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यातील कृषी विद्यापिठांतर्गत तसेच इतर शासन अंगीकृत संस्थाना नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रकल्प मुल्याच्या 100 टक्के (जास्तीत जास्त रुपये 250 लाख) इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीतकमी 25 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे. ज्या संस्थाकडे आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध आहे, अशाच सार्वजनिक क्षेत्रातील संस्थाना नवीन उत्तीसंवर्धन प्रयोगशाळा मंजूर करण्यात येईल. खाजगी क्षेत्रातील नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठो, 40 टक्के प्रकल्प मुल्याच्या (जास्तीत जास्त रुपये 100 लाख) प्रती प्रयोगशाळा अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. सदरचा प्रकल्प हा बँक कर्जाशी निगडीत असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळेने उपलब्ध निर्मिती तंत्राआधारे त्यांना मान्यता असलेल्या पिकांची कमीतकमी 25 लाख रोपे उत्पादन करणे आवश्यक आहे.
उतीसंवर्धन प्रयोगशाळेला जैवतंत्रज्ञान विभागाच्या मानके व निकषानुसार अनुदान मिळाल्यापासुन 18 महिन्यांच्या आत मानांकन प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक राहील. तरी, नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करण्याकरीता अधिकाधिक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखालो अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी कळविले आहे.
०००००

No comments:
Post a Comment