खाजगी आस्थापनेतील मतदारांना मतदानासाठी चार तासांची सवलत
चंद्रपूर, दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने 22 सप्टेंबर 2026 रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणूकीचे मतदान 23 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार) रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीत होणार आहे. मतदानासाठी खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी 2 तासांची विशेष सवलत देण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. मात्र आता ही सवलत 2 ऐवजी 4 तासांची करण्यात आली आहे.
निवडणूकीच्या मतदान केंद्राचे अंतर काही ठिकाणी अधिक असल्याने प्रवास करण्यासाठी जास्त वेळ जातो. त्यामुळे सदर निवडणूकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी 2 ऐवजी 4 तासांची विशेष सवलत देण्याचे नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment