Search This Blog

Wednesday, 4 November 2020

पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक


 पदवीधर मतदार संघ निवडणुकीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

आचारसंहिता अंमलबजावणीबाबत दिले निर्देश

चंद्रपूर, दि. 4: भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग पदविधर मतदार संघ निवडणूक- 2020 चा कार्यक्रम दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज नियोजन सभागृहात बैठक घेवून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याने तात्काळ प्रभावासह आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

            यावेळी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आदर्श आचारसंहिता कालावधीत नवीन योजनांची घोषणा न करणे, शासकीय संदेश प्रणालीवरील राजकीय नेत्यांचे छायाचित्रे काढून टाकणे, नवीन निविदा प्रक्रीया न करणे, नवीन कामांना तांत्रीक मंजूरीची शिफारस न करणे, शासकीय वाहनाचा प्रचारासाठी वापर न करण्याबाबत, राजकीय पदाधिकाऱ्यांकडील शासकीय वाहन शासनजमा करून घेणे, कोणतेही उद्घाटन, भूमिपूजन सोहळा आयोजित न करणे यासह इतर महत्वपुर्ण बाबीवर आचारसंहिता कालावधीत काय करावे व काय करू नये यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

जिल्ह्यात 36 मुख्य मतदान केंद्र तर 14 सहाय्यक मतदान केंद्र असे एकूण 50 मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत पदवीधर मतदारांची एकूण संख्या 32 हजार 89 इतकी आहे. 5 नोव्हेंबरपासून सुरू होणारी निवडणूक प्रक्रिया 7 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी निवडणूक आयोगाच्या दिनांक 26 डिसेंबर 2016 परिपत्रकात नमूद बाबींचे पालन करण्याबाबत सांगितले.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ,  उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता रा.च. कांबळे, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता क.सं सोनेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एस.ए.गबाळे कनिष्ठ अभियंता डी.एन.कामडी, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक एम.एस पाटील, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उप अभियंता पि.टी. जिवतोडे तसेच महानगरपालीका, आरोग्य व पोलीस विभागासह इतर संबंधीत कार्यालयाचे अधिकारी  प्रामुख्याने उपस्थित होते.

00000

गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही

 


गेल्या 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू नाही ; 157 नव्याने पॉझिटीव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 13304 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 2783

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 16329

चंद्रपूर, दि. 4 नोव्हेंबर: जिल्ह्यात मागील 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झाला नाही तर 169 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच 157 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 157 बाधितांसोबत आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 16 हजार 329 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 169 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरुवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 304 झाली आहे. सध्या 2 हजार 783 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 23 हजार 46 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 5 हजार 246 नमुने निगेटीव्ह आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.नागरिकांनी बाहेर पडतांना तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा तसेच दैनंदिन कामे करताना सोशल डिस्टंसिंग पाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या 157 बाधितांमध्ये 92 पुरुष व 65 महिला आहेत. यात चंद्रपूर शहर व परीसरातील 34,  बल्लारपूर तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील पाच, मुल तालुक्यातील पाच, गोंडपिपरी तालुक्यातील चार, कोरपना तालुक्यातील आठ, ब्रह्मपुरी तालुक्यातील 24, नागभिड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील 19, भद्रावती तालुक्यातील 22, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील 9, राजुरा तालुक्यातील सात, गडचिरोली येथील तीन तर यवतमाळ येथील एक असे एकूण 157 बाधित पुढे आले आहे.

याठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील उत्तम नगर, ऊर्जानगर, कृष्णनगर, सिव्हिल लाईन, गंजवार्ड, तुकूम, नगिना बाग, ताडाली, जेबी नगर, बगड खिडकी परिसर, रयतवारी, संजय नगर, गजानन महाराज मंदिर परिसर, पत्रकार नगर, घुग्घुस भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मी वार्ड, बालाजी वार्ड, संतोषी माता वार्ड, मौलाना आजाद वार्ड, श्रीराम वार्ड, रयतवारी कॉलनी परिसरातून बाधित ठरले आहे. चिमूर तालुक्यातील चक लोहारा भागातून बाधित पुढे आले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर आठ, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 15, बोरचांदली परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी, बस स्टँड परिसरातुन बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूर, आवारपूर, पळसगाव भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, पटेल नगर, सिव्हिल लाइन, विदर्भ इस्टेट परिसर, टिळक नगर, शिवनगर उदापूर, गुजरी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील तलोढी, बाळापुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा, यात्रा वार्ड, अभ्यंकर वार्ड, कॉलरी वार्ड, नेहरू चौक, जिजामाता वार्ड, टेमुर्डा, शेगाव भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील पांडव वार्ड, सुमठाणा, महात्मा फुले नगर, दरबार सोसायटी परीसर, झिंगोजी वार्ड, पंचशील नगर, चंडिका वार्ड, शिवाजीनगर, किल्ला वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील मोखाळा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव, मिनघरी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील रामनगर, रामपूर, देशपांडे वाडी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000

सौर कृषी पंप योजने करिता ऑनलाईन अर्ज आमंत्रित


सौर कृषी पंप योजने करिता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि. 4 नोव्हेंबर:महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या यांनी अनुसुचित जाती प्रवर्गा करिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेची सविस्तर माहिती महावितरणचे ऑनलाईन पोर्टलवर https://www.mahadiscom.in/solar या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGsolarPump?uiActionNamegetA1from. या लिंकवरून ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

00000

Tuesday, 3 November 2020

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करावे: कृषी विभागाचे आवाहन

 

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करावे: कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 3 नोव्हेंबर : नोव्हेंबर महिण्यातील वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे, त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यपरिस्थितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या एक ते दोन वेचण्या झालेल्या आहे. काही ठिकाणी कापसाच्या झाडाला 10 ते 15 बोंड्या तर कुठे 50 ते 60 बोंड्या आहेत. ज्या ठिकाणी कापसाला कमी बोंडे असून बोंड पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी मिळणारे उत्पन्न लक्षात घेवून फवारणीचा निर्णय घ्यावा. पण ज्या ठिकाणी बोंडाची संख्या जास्त आहे, बोंडे हिरवी आहे, अशा ठिकाणी खालील उपाय योजना कराव्यात.

प्रत्येक आठवड्याला एकरी शेतीचे प्रतिनिधीत्व करतील अशी 20 झाडे निवडून त्या प्रत्येक झाडावरील मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे 20 बोंडे तोडावे. ते भुईमुंगाच्या शेंगाप्रमाणे दगडाने टिचवून त्यामधील किडकी बोंडे व बोंड अळयांची संख्या मोजून दोन किडक बोंड किंवा दोन पांढूरक्या रंगाच्या लहान अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (5 ते 10 टक्के) समजून पुढे सांगितल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 5 ते 10 टक्के दरम्यान आहे. अशा ठिकाणी सायपरमेथ्रीन 10 टक्के इसी 8 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 इसी 3.5 मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के इसी 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 12 मिली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

जेथे प्रादुर्भाव 10 टक्केच्या वर आहे अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणून कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायझोफॉस 35 टक्के + डेल्टामेथ्रीन 1 टक्के 17 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 + सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के + अॅसीटामाप्रिड 7.7 टक्के 10 मिली. किंवा सायपरमेथ्रीन 10 टक्के + इंडोक्झाकार्ब 10 टक्के डब्लु.डब्लु.एस.सी. 12 मि.ली. आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

सद्यपरिस्थितीत बहुतांश ठिकाणी कपाशीचे पिक 4 ते 5 फुट उंचीचे असून त्याच्या फांद्या हि दाटलेल्या आहेत अशा परिस्थितीत किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होवू शकते म्हणून कपाशीवर फवारणी करतांना कटाक्षाने फवारणी किटचा वापर करूनच फवारणी करावी. तसेच फवारणी करतांना सकाळी व वा-याच्या दिशेने फवारणी करावी.

 सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तीसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी दिसून आल्यास ही अळी 3 ते 4 दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10 ते 15 दिवसांनी कोषातील पतंग निघून अंडी टाकण्यास सुरूवात करू शकतात व गुलाबी बोंडअळीच्या दुस-या पीढीच्या प्रादूर्भास सुरूवात होवू शकतो अशा ठिकाणी  किटकनाशकाची फवारणी करून पतंगाच्या व्यवस्थापनासाठी फेरोमन सापळयांचा वापर करावा. यासाठी एकरी 2 किंवा हेक्टरी 5 फेरोमन सापळे लावावे.अशाप्रकारे गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यात यावे. शेतकऱ्यांना काही अडचणी येत असल्यास तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

00000

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त

 

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 13135 कोरोनामुक्त

जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू ;182 नव्याने पॉझिटिव्ह

Ø बाधितांची एकूण संख्या 16172

Ø उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2795

चंद्रपूर, दि. 3 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 182 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 16 हजार 172 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 134 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 13 हजार 135 झाली आहे. सध्या 2 हजार 795 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून एक लाख 22 हजार 254 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी एक लाख 4 हजार 563 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील 72 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 51 वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील 42 वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील 65 वर्षीय महिला,  भद्रावती येथील 71 वर्षीय पुरुष तर गडचिरोली येथील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 242 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 226, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली सात, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 118 पुरूष व 64 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 55,  बल्लारपूर तालुक्यातील 20, चिमूर तालुक्यातील चार, मुल तालुक्यातील तीन, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील 10, ब्रह्मपुरी तालुक्यातील 10, नागभीड तालुक्यातील पाच, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील 35, सिंदेवाही तालुक्यातील आठ, राजुरा तालुक्यातील 10, गडचिरोली 11 तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असे एकूण 182 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील गजानन मंदिर वार्ड, चव्हाण कॉलनी परिसर, सरकार नगर, तुकडोजी नगर, कृष्णा नगर, नगीना बाग, साईबाबा वार्ड, बापट नगर, गांधी नगर, बाबुपेठ, दुर्गापुर, ताडाळी, भिवापूर, जयराज नगर, हॉस्पिटल वार्ड, शिवाजीनगर, तुकूम, सुमित्रा नगर, ओम नगर, जटपुरा गेट परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, उत्तम नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील  लक्ष्मी नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, झाकीर हुसेन वार्ड, विसापूर, विवेकानंद वार्ड, सुभाष वार्ड, गांधी वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, गणपती वार्ड, बामणी, संतोषीमाता वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील अभ्यंकर वार्ड, डोंगरगाव रेल्वे, जाजू हॉस्पिटल परिसरातून पाॅझिटीव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर, गुरुदेव नगर, नागेश्वर नगर, शेष नगर, देलनवाडी  परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील समता नगर, माजरी, चंडिका वार्ड, किल्ला वार्ड, ऑर्दनन्स फॅक्टरी चांदा परिसर, नेताजी नगर, पंचशील नगर, झाडे प्लॉट, पांडव वार्ड, गुरु नगर, राधाकृष्ण कॉलनी परिसर, पावर ग्रिड कॉलनी परिसर, लक्ष्मी नगर, भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

चिमूर तालुक्यातील वडाळा पैकु, वेलकम कॉलनी परिसर भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील कूसराळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील सोनुरली गडचांदूर, आवारपूर, आंबेडकर भवन, माणिक गड कॉलनी परिसर, भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील पिक्चर कॉलनी परिसर, सास्ती, भारत चौक, अमराई वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, नवरगाव, लाडबोरी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मंगरूळ, गिरगाव परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000