Search This Blog

Monday, 31 December 2018

गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांच्या पुढाकाराने घुग्गुसमध्ये 552 शेतक-यांना नौकरी व 135 कोटींचा मोबदला वाटप



जमिनीच्या पैशातून नवीन जमिनी खरेदी करा   
वेस्टर्न कोल्डफील्ड लिमीटेडकडून शेतकऱ्यांना मोबदला व नौकरी

चंद्रपूर दि. 31 डिसेंबर : आमच्या हजारो पिढ्यानी आधी शेतीच केली आहे. त्यामुळे शेती कशी करायची हे आमच्या रक्तात आहे. शेती आपली आई आहे. त्यामुळे प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांनी त्याचा मोबदला घेताना पैसा हातचा न गमावता काही पैशातून पुन्हा शेती खरेदी करा,केंद्र सरकारने मोबदल्याचे धोरण बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्याचा शेतकऱ्यांनी योग्य उपयोग करावाअसे भावनिक आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी घुगुस येथे आयोजित एका कार्यक्रमात केले.
         वणी क्षेत्रातील मिनी रत्न कंपनी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मुंगोलीनिरगुडा प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना आज 135 कोटी रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. तसेच 552 शेतक-यांना वेकोलिच्या प्रकल्पात नौकरी देण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याहस्ते हे धनादेश वाटप वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेडने आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात पार पडले.
          शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी ज्या शेतकऱ्यांची शेती केली. त्यांनी ती पुन्हा घ्यावी असे भावनिक आवाहन केले. 2022 पर्यंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे आवाहन केले असून शेतीला चांगले दिवस येत असल्याचे सूतोवाच यावेळी केले.या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासह वेकोलि अध्यक्ष प्रबंध निदेशक आर.आर. मिश्रावणीचे आमदार संजीवरेड्डी बोदरकुरवारजिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळेसभापती ब्रिजभुषण पाझारेखुशाल बोंडेविजय पिदूरकरदिनकर पावडेवेकालि वणी क्षेत्राचे क्षेत्रिय महाप्रबंधक श्री. मिश्रावेकालि वणी क्षेत्राचे नवीन क्षेत्रिय महाप्रबंधकश्री. कावळेजि.प. सदस्य नितू चौधरीराहूल सराफ,बेलसनीच्या सरपंच मनिषा वाढईनिलजईचे सरपंच मनोज डंभारेबेलोराचे सरपंच प्रकाश खुटेमाटे आदी उपस्थित होते.
          यावेळी संबोधित करताना हंसराज अहिर यांनीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव असून त्यांच्या काळातच मोबदला देण्याचे ब्रिटीशकालीन कायदे बदल करण्यात आले आहेत. गरीब घरात जन्मलेल्या प्रधानमंत्र्यांना गरिबीची जाणीव असून त्यामुळेच येत्या काळामध्ये शेतीला चांगले दिवस येतील ,अशी आशा आपण बाळगायला हवी. 
          प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण अवलंबिले आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेती प्रकल्पामध्ये जात आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मोबदला मिळतो आहे. मात्र या मोबदल्यात काही रक्कम पुन्हा वेगळ्या ठिकाणी शेती घेण्यासाठी खर्च करावी,अशी आपली प्रामाणिक सूचना आहे. कारण शेती ही कुठल्याही परिस्थितीत आपल्याला जगण्यास व आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यास कमी पडते. यासाठी आपल्याला कुठल्या आयटीआयचे प्रशिक्षण घ्यायची गरज नसते. कारण आमच्या लाखो पिढ्यांना शेती कशी करायची माहिती आहे.वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा व घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी यावेळी उल्लेख केला.
        कधीकाळी कोळसा खाणी व संबंधीत कंपन्या ह्या घोटाळ्यासाठी प्रसिद्ध झाल्या होत्या. आपण सुद्धा या कोळशाच्या विक्री प्रकरणांमध्ये लक्ष घातले होते. संसदेत आवाज उचलला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोळसा खाणीच्या पैसा सार्वजनिक हिता मध्ये आता वापरात येऊ शकला आहे. आज मोठ्या संख्येने आणि मोठ्या प्रमाणात याठिकाणी मोबदला देता आला याचा आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
      या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी देखील यावेळी संबोधित केले. शेतकऱ्यांच्या संदर्भात गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  यांनी जिल्हाभर केलेल्या लढ्याला त्यांनी यावेळी शेतकऱ्यांपुढे मांडले. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढणारा विदर्भातील अग्रणी नेता असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वणीघुगुसवरोराभद्रावती या ठिकाणी गेल्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये हंसराज अहीर यांनी मोठा लढा उभारून शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
                                                            00000

भारतीय शिक्षण संस्‍थेने विद्यार्थ्‍यांना जिवनमुल्‍ये शिकविली- सुधीर मुनगंटीवार



श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभानिमित्‍त
स्‍व.धनंजय नाकाडे कलादालन व पसायदान सभागृहाचे लोकार्पण

 चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर -कोणत्‍याही देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन हे तो देश किती धनसंपन्‍न आहे यावर होत नसुन तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर होत असते. कै. बालाजी पाटील बोरकर यांनी नवरगाव परिसरात विद्यादानाचे ईश्‍वरीय कार्य सुरू केले. भारतीय शिक्षण संस्‍था ही कष्‍टातुन उभी झालेली संस्‍था आहे. आज असंख्‍य संस्‍था आहे. मात्र अनेक संस्‍था केवळ व्‍यवहारशास्‍त्र शिकवत असल्‍याचे आपण बघतो. भारतीय शिक्षण संस्‍थेने मात्र जीवनशास्‍त्र शिकविण्‍याचे मोठे कार्य केले आहे. या संस्‍थेच्‍या शतकोत्‍तर वाटचालीसाठी मी शुभेच्‍छा देतो असे प्रतिपादन  अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
 दि.29 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील नवरगाव येथे ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकरमाजी आमदार प्रा. अतुल देशकरश्री. परमानंद पाटील बोरकरभारतीय शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष जयंत बोरकरसचिव सदानंद बोरकरमहाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाकरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणालेकला या दोन अक्षरांच्‍या शब्‍द समुहात मनाचे पोषण करण्‍याचा भाव दडला आहे. आज आपला समृध्‍द सांस्‍कृतीक वारसा जतन करीत आहोत. बल्‍लारपुरमुल येथे नाट्यगृह आपण बांधले आहे. ब्रम्‍हपुरी येथे नाट्यगृहाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले आहे. कला व संस्‍कृतीची जपणुक करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न‍शील आहोत. मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट हे शिखर सर केले. आता मिशन सेवा या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुका स्‍तरावर स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी अभ्‍यासिका आपण बांधणार आहोत. या ठिकाणी बसस्‍थानकाची मागणी करण्‍यात आली. जिल्‍हयात 11 नवीन बसस्‍थानके आपण बांधत आहोत. चंद्रपूरभद्रावतीचिमुरबल्‍लारपुरमुलघुग्‍घूस या ठीकाणी बसस्‍थानकांची बांधकामे सुरू झाली आहेत. आपण जागा उपलब्‍ध करा निश्चितपणे या मागणीचा विचार करू असेही यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्‍या हस्‍ते स्‍व. धनंजय नाकाडेस्‍मृती कलादालनाचे उद्घाटन करण्‍यात आले.  तसेच पसायदान सभागृहाचे लोकार्पण करण्‍यात आले. या महाविद्यालयाची समृध्‍द परंपरा व यशस्‍वी वाटचाल प्रत्‍येक महाविद्यालयासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्‍याचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकर म्‍हणाले. सभारंभाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी केले. संस्‍थेचा प्रवास विशद करणारे मनोगत सचिव सदानंद बोरकर यांनी व्‍यक्‍त केले.
श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या उभारणीत योगदान देणा-यांच्‍या वारसांचा सन्‍मान सुवर्ण महोत्‍सवी समारंभात करण्‍यात आला. काही माजी प्राचार्य व कर्मचारी यांना सेवा योगदान सन्‍मान देवुन गौरव  करण्‍यात आला. 50 वर्षाच्‍या उभारणी पर्वातील आठवणिंना उजाळा देणारी ज्ञानार्थ ही स्‍मरणीका यावेळी विमोचीत करण्‍यात आली. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी वृंदविद्यार्थी विद्यार्थींनीपालक व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. 
0000000

बल्लारपूर रोजगार निर्मितीचे केंद्र होईल : ना.सुधीर मुनगंटीवार



शहरातील सात कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन  संपन्न 
3 हजार बेघरांना हक्काचे घर देण्याचा प्रकल्प राबवणार
बल्लारपूर भारतातील सर्वात सुंदर शहर बनवण्याचे आवाहन

चंद्रपूरदि.30 डिसेंबर - बॉटनिकल गार्डनसैनिकी शाळाक्रीडा संकुलडायमंड प्रशिक्षण केंद्रएक हजार महिलांसाठी सिलाई मशीन केंद्र अशा अनेक पायाभूत सुविधा शहरात निर्माण होत आहे. या माध्यमातून बल्लारपूरतील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतील. बल्लारपूर हे भारतातील एक सर्वात सुंदर शहर म्हणून पुढे येतच आहे. नजीकच्या काळात ते रोजगार निर्मितीचे मुख्य केंद्र देखील होईलअसे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
           
बल्लारपूर शहरातील शिवाजी वार्डगौरक्षण वार्डरविन्द्र नगर वार्ड ,मौलाना आझाद वार्ड आदी ठिकाणच्या 7 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमीपूजन आज ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील विविध तीन भागांमध्ये घेतलेल्या सभांमध्ये बोलताना त्यांनी बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या शहराने भरभरून आपल्याला दिले असल्यामुळे या शहराला  रोजगारशिक्षणआरोग्य, पिण्याचे पाणीरस्ते व आवश्यक पायाभूत सुविधांनी भारतातील एक सुंदर शहर बनविण्याचे आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 बल्लारपूर मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील बदल आता लक्षात येण्याइतपत  जाणवतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील एका सर्वांगसुंदर मतदारसंघाचे वैभव या बल्लारपूर मतदारसंघाला प्राप्त होईल. येथील सैनीकी शाळा देशाला भूषण ठरणारी बनत आहे. बॉटनिकल गार्डनची जोमाने तयारी सुरू आहे. शहरांमध्ये तयार होत असलेल्या क्रीडा संकुलामधून 2024 मध्ये देशासाठी ऑलिम्पिक पदक पटकविणारे खेळाडू तयार व्हावेत, अशी अपेक्षा आहे. मुलींची पहिली डिजिटल शाळा नगरपालिकेमार्फत या ठिकाणी निर्माण होत आहे. षटपूजेसाठी उत्तम व्यवस्था, गणपती घाट, पोलीस स्टेशन, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह, वाचनालय शहराच्या वैभवात भर टाकत आहेत.  शहरात उत्तम बाजारपेठही आकाराला येणार आहे. याठिकाणी अद्ययावत पोलीस ठाणे, उपविभागीय कार्यालय लक्षवेधी ठरले आहे.
बल्लारपूर शहरांमध्ये एकूण 90 कोटी रुपये खर्च करून 24 तास चालणाऱ्या पाणीपुरवठा योजनेला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र रस्ते निर्मिती आणि पाईपलाईन टाकण्याच्या कामाची सांगड घालण्यासाठी या योजनेला थोडा विलंब होत आहे. बल्लारपूरच्या प्रत्येक वार्डामध्ये  नागरिकांना मिनरल वॉटरपेक्षाही शुद्ध पाणी देणारे पाण्याचे एटीएम उघडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र या सर्व विकास कामांमध्ये या शहराच्या नागरिकांकडूनही काही अपेक्षा असल्याचे  त्यांनी सांगितले. ते म्हणालेदेशांमध्ये स्वच्छता अभियानात हे शहर पहिले आले पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी देखील आपले दायित्व निभवावे. भारतात सर्वात स्वच्छ व सुंदर शहर हे माझ्या मतदारसंघात आहे, याचे मला समाधान असले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बल्लारपूर मतदारसंघाने आपल्याला भरभरून दिले आहे. याचा विसर आपणास कधीच पडणार नाही. बल्लारपूर शहरातील तीन हजार बेघरांना अद्यावत घरे देण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय बल्लारपूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसाठी डायमंड प्रशिक्षण केंद्रासोबत कापड उद्योगाला पूरक ठरेल असे एक हजार शिलाई मशीनचे युनिट उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी सुरु होणारे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा व अन्य मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक बेरोजगारांना उपलब्ध व्हावे, ही महत्वाकांक्षा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील संविधान चौकाचे सुशोभिकरण करण्यात येईल तसेच बल्लारपूर शहरांमध्ये देखील एक अद्यावत अभ्यासिका सुरू करून मिशन सेवाच्या माध्यमातून या ठिकाणच्या मुलांमध्ये सरकारी नोकरीतील टक्का वाढविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या विकासकामांच्या भूमीपूजनाला वन  विकास  महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेलबल्लारपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हरिष शर्माउपाध्यक्ष मीनाताई चौधरीसभापती रेणुका दुधेउपविभागीय अधिकारी कल्पना नीळ,नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपिन मुग्धानगरसेवक निशांत आत्राममीना बहुरिया, सुवर्ण टाकर, सागर राऊतसचिन जाधव, पुनम निरांजने  याशिवाय अन्य नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                            000

Saturday, 29 December 2018

महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीला वृद्धींगत करण्याचे चिंतन कला शिक्षण परिषदेत व्हावे : ना.सुधीर मुनगंटीवार



* कला शिक्षकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी
      शिक्षक मंत्र्यासमवेत बैठक घेणार
    * समाजाच्या आनंदाचा जीडीपी वाढवण्याचा
                           कला शिक्षकांनी संकल्प करावा
                        * चंद्रपूरमध्ये 40 व्या कला शिक्षण परिषदेला सुरुवात

चंद्रपूर दि. 29 डिसेंबर : समाजाला आनंद देण्याची शक्ती कलेमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कलागुणांच्या माध्यमातून समाजाच्या मनाचा जीडीपी मोजता आला पाहिजे. त्यांचे पर कॅपिटा समाधान मोजता आले पाहिजे. त्यामुळे समृद्धसमाधानी महाराष्ट्र उभारण्याचे,महाराष्ट्राची कलासंस्कृती टिकविण्याचे चिंतन दोन दिवसांच्या कला शिक्षण परिषदेत झाले पाहिजे, असे आवाहन राज्याचे वित्तनियोजनवने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संलग्न असणाऱ्या चंद्रपूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने 44 व्या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेचे आयोजन स्थानिक प्रियदर्शनी सभागृहामध्ये करण्यात आले आहे. 29 व 30 डिसेंबर या कालावधीमध्ये हे संमेलन होत आहे. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनांमधून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला चालना मिळावीनव्या ध्येय - धोरणासाठी याठिकाणी चिंतन व्हावेअशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रदेशाची ओळख त्या प्रदेशातील कलासंस्कृतीमुळे होत असते. जगाला केवळ आता कलेने जिंकता येते. त्यामुळे आपल्या प्रदेशाची ओळख ही येथील कला व कलाकारांमुळे असते. तुम्ही केलेल्या कलाकृती अजरामर राहणार असून तीच खरी कलाकाराची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलेची कोणतीही जात,धर्म वा कुठलाही भेदाभेद नसतो. समाजाच्या समाधानाचा उत्कर्ष कलेमध्ये असतो. त्यामुळे तो  वृद्धिंगत करणे आपल्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.
            स्वागताध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी सुरुवातीला कला शिक्षकांच्या समस्या या व्यक्त केल्या. याबाबत आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणामध्ये ऊहापोह करताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. राज्य शासन हे कला शिक्षकांच्या पाठीशी असून त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असेहीत्यांनी स्पष्ट केले.
            महाराष्ट्रमध्ये कला आणि संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृह व सभागृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक विभागाकडून यासंदर्भात अहवाल मागून घेतला होताअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी  महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या नाट्यगृहांची यादीच त्यांनी कलाशिक्षकांना सांगितली.
           यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी संबोधित केले. महाराष्ट्राची ओळख कला संस्कृतीमुळे होत असतानासुद्धा कलाशिक्षक यांच्या नियुक्त्यांमध्ये खंड पडू नये ,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कलाशिक्षकांची मुबलक उपलब्धता व त्यांच्या सोयी सवलतीकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
           या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणेचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील होते. सामाजिक नेते किशोर जोरगेवारमाध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या कला प्रदर्शनीला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
00000

घुग्‍घूसच्‍या विकासासाठी सदैव वचनबध्‍द - सुधीर मुनगंटीवार



बसस्‍थानक बांधकामाचे तसेच 27 कोटी रू किंमतीच्‍या उंच पुलाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन संपन्‍न

चंद्रपूर दिनांक 29 डिसेंबर : 1995 मध्‍ये मी महाराष्‍ट्र विधानसभेत प्रथमच निवडुन गेलो. माझ्या त्‍या विजयात घुग्‍घूस वासीयांच्‍या प्रेमाचा मोठा वाटा आहे. घुग्‍घूसच्‍या विकासासाठी मी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध करून दिला आहे.  गेल्‍या वर्षी 2515 या लेखा शिर्षाअंतर्गत 2 कोटी रू. निधी उपलब्‍ध करून दिला असून 8 कोटी रू खर्चुन अत्‍याधुनिक बसस्‍थानक या शहरात बांधण्‍यात येत आहे. घुग्‍घूस येथील 10 ओपन स्‍पेसच्‍या विकासासाठी 5 कोटी रू. निधी आपण लवकरच मंजुर करणार असुन घुग्‍घूस येथे सर्व सोयींनी युक्‍त स्‍टेडियमचे बांधकाम सुध्‍दा करण्‍यात येणार आहे. घुग्‍घूस येथील नागरिकांनी आजवर माझ्या केलेल्‍या प्रेमाला मी कधीही उतराई होणार नाही. या शहराच्‍या विकासासाठी मी सदैव वचनबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दि. 28 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील घुग्‍घूस येथे विविध विकास कामांच्‍या भुमीपुजन सोहळयानिमित्‍त आयोजित जाहीर सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर, जिल्‍हा परिषदचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेचे समाज कल्‍याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, जिल्‍हा परिषद सदस्‍य रणजीत सोयाम, सौ. नितु चौधरी, पंचायत समितीच्‍या सभापती सौ. वंदना पिंपळशेंडे, पंचायत समिती सदस्‍य निरिक्षण तांड्रा, घुग्‍घूसचे सरपंच संतोष नुने, चंद्रपूर तालुका भाजपाचे अध्‍यक्ष नामेदव डाहुले, घुग्‍घूस भाजपाचे अध्‍यक्ष विवेक बोढे, माजी जि.प. सदस्‍य चिन्‍ना नलबोगा, चंद्रपूर मनपाचे स्‍थायी सभापती राहुल पावडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर जिल्‍हयात विकासाचे अनेक प्रकल्‍प आम्‍ही आणले आहेत. चंद्रपूर येथील वनअकादमीची इमारत भारतात दुस-या क्रमांकाची मानकरी ठरली आहे. चंद्रपूर जिल्‍हयासाठी मेडीकल कॉलेज, सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, कॅन्‍सर हॉस्‍पीटल असे विविध प्रकल्‍प आपण राबवित आहोत. चिचपल्‍ली येथील बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्र नुकतेच सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले आहे. विकासाचे विविध टप्‍पे चंद्रपूर जिल्‍हयातील नागरिक अनुभवत आहे असेही ते म्‍हणाले.
27 कोटी रू किमतीच्‍या मोठया पुलाचे बांधकाम

चंद्रपूर वणी यवतमाळ रस्‍त्‍यावरील घुग्‍घूस गावाजवळ वर्धा नदीवर असलेला अस्तित्‍वातील पूल वाहतुकीसाठी अरूंद असल्‍यामुळे, दुसरा मोठा पूल अस्तित्‍वातील असलेल्‍या पूलाचे बाजूने बांधण्‍याचे ठरले आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता रूपये 27.00 कोटी असून पूलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. सदर पूलाची लांबी 251.00 मीटर असून रूंदी 12.00 मीटर आहे. सदर पूलाचा बांधकाम कालावधी 18 महिने असून जानेवारी 2020 मध्‍ये पूलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. चंद्रपूर वणी रस्‍ता चार पदरी आहे, परंतु अस्तित्‍वातील पूल फक्‍त दोन पदरी असल्‍यामुळे नविन पूलाचे बांधकाम केल्‍यास पूलावरूनसुध्‍दा चार पदरी वाहतुक सुरू होईल अशी माहीती त्‍यांनी यावेळी बोलतांना दिली. विकासासंबंधी आजवर नागरिकांना जी आश्‍वासने आम्‍ही दिली ती प्राधान्‍याने पुर्ण केली आहेत असेही ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी बोलतांना केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर म्‍हणाले, अर्थमंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वात हा जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. अनेक प्रकल्‍प, उपक्रम त्‍यांनी जिल्‍हयात राबविले आहेत. रस्‍ते विकास, पाणी पुरवठा सर्वच क्षेत्रात त्‍यांच्‍या नेतृत्‍वात जिल्‍हयात लक्षणीय कामगीरी सुरू आहे. केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातुन सुध्‍दा विविध विकास कामे या क्षेत्रात आम्‍ही केली आहेत. असेही ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी बोलतांना जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे म्‍हणाले,  विकास आणि भारतीय जनता पार्टी हे एक अनोखे समिकरण या जिल्‍हयात निर्माण झाले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कधी नव्‍हे इतका निधी या जिल्‍हयाच्‍या विकासासाठी उपलब्‍ध करून दिला आहे. जिल्‍हयातील प्रत्‍येक शहर, ग्रामीण भाग विकासाच्‍या वाटेवर  आघाडीवर आहे. विकासाचा हा झंझावात यापुढेही असाच सुरू राहणार असुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृहराज्‍य मंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात ही विकास यात्रा अशीच पुढे जाणार असल्‍याचे ते यावेळी बोलतांना म्‍हणाले.
यावेळी अत्‍याधुनिक बसस्‍थानकाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन, 27 कोटी रू खर्चुन बांधण्‍यात येणा-या घुग्‍घूस-वणी-यवतमाळ उंच पुलाच्‍या बांधकामाचे भुमीपुजन करण्‍यात आले. जाहीर सभेला नागरिकांची मोठया संख्‍येनी उपस्थिती होती. 
000000