Search This Blog

Monday, 10 December 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत उत्पूर्तपणे प्रतिसाद --डॉ . कुणाल खेमणार, जिल्हाधिकारी, चंद्रपूर


जिल्हयात विविध शाळेतून आजपर्यंत 217004 विदयार्थाचे झाले लसीकरण

चंद्रपूर दि. 10 डिसेंबर : जिल्हयात 27 नोव्हेंबर पासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरुवात होउन शाळा सत्रात दहा दिवसापर्यंत जिल्हयातील शहरीग्रामीन व महानगरपालीका क्षेत्रातील एकुन 2654 शाळापैकी 1812 शाळामधून 217004 विदयार्थांना लसीकरण करण्यात आले आहे. याकरीता पालक व विदयार्थी यांचा उत्पूर्तपणे सहभाग लाभत आहे. जिल्हयात आजपर्यंत कोनतीही  अनुचित घटना न घडता गोवर रुबेला लसीकरण मोहिम यशस्वीपणे सुरु आहे. जिल्हयातील एकही 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील मुले-मुंली गोवररुबेला लसीकरणापासुन वंचित राहणार नाही याकरीता  कार्यक्रमात सहभागी सर्व विभाग व संस्था सर्वतोपरी कार्य करीत आहेत. सदर मोहिमेकरीता जिल्हयातील ग्रामीन व शहरी भागातील विविध शाळेतून रॅलीचर्चासत्र अश्या विविध प्रसिध्दी माध्यमादवारे जनजागृती करण्यात येत आहे.,अशा प्रकारे मोहिम संपेपर्यंत लसीकरणाचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मीळण्याकरीता शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. तरी सदर मोहिमेचा लाभ  सर्व  लाभार्थ्यांनी   घ्यावा  व 100 टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना लसीकरण करण्याचे   आवाहन  डॉ . कुणाल खेमणारजिल्हाधिकारीचंद्रपूर मा. जितेंद्र पापळकरमुख्य कार्यकारी अधिकारीजि.प.चंद्रपूरडॉ.प्रकाश साठे जिल्हा आरोग्य अधिकारी, .चंद्रपूरडॉ.निवृत्ती राठोड जिल्हा शल्य चिकित्सक सा.रु.चंद्रपूर डॉ.अंजली आंबटकरवैदयकीय अधिकारीमहानगरपालीका चंद्रपूर उॉ.संदीप गेडाम जिल्हा लसीकरण अधिकारीजि.प.चंद्रपूर यांनी एका पत्रकाद्वारे जिल्हयातील सर्व जनतेला केले आहे.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर-रुबेला या दोन्ही आजाराचे नियंत्रणाकरीता एक इंजेक्शन व्दारे लसीकरण केले जात आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आजार आणि घातक आजार आहे हा मुख्यता लहान मुलांना होतो व या आजारानंतर होणा़-या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होउ शकतो तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असला तरी गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संसर्ग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व,बहिरेपणामतीमंदत्वहृदय विकृती होवू शकते. या करीता गोवर-रुबेला आजारापासून संरक्षणाकरीता सर्व मुलांमुलींना लसीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. या पासुन कोणताही धोका नाही असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सदर मोहिम जिल्हयात 27 नोव्हेबर पासुन 5 आठवडयाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. यात जिल्हातील सर्व शाळासरकारी,निमसरकारी,खाजगी,अनुदानितविनाअनुदानितआश्रम शाळामदरसे,सिबीएससी,आयसीएससीकेंद्रीय विदयालयइ. शाळा मध्ये पहिल्या दोन ते तिन आठवडयात व त्यानंतर अंगणवाडी केंद्र व सर्व सरकारी आरोग्य संस्थेत मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. अशा प्रकारे 5 आठवडे सदर मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार आहे. सदर मोहिम आरोग्य विभागासोबतचशिक्षण विभागएकात्मिक बालविकास विभाग यांचे समन्वयाने राबविण्यात येत आहे.
0000

No comments:

Post a Comment