Search This Blog

Monday 3 December 2018

चंद्रपूर मध्ये पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ



केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ चंद्रपूरकरांना
मिळावा यासाठी आपला प्रयत्न : ना.हंसराज अहीर

चंद्रपूर, दि.3 डिसेंबर - पोस्टाच्या सर्व योजना असोतरेल्वेदूरसंचार किंवा व अन्य कोणत्याही विभागाच्या केंद्रीय योजनांच्या संदर्भातील पहिला लाभ चंद्रपूरकरांना मिळावा यासाठी आपला प्रयत्न असून आज चंद्रपूरच्या नागरिकांना पासपोर्ट सेवा केन्द्र अर्पण करताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांनी दिली आहे.
पासपोर्ट संदर्भातील आपल्या मागणीसाठी चंद्रपूर व परिसरातील जनतेला नागपूर येथे जावे लागत होते. त्यामुळे पासपोर्ट बनविणे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळ लागणारे काम होते. तथापिआता चंद्रपूर येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्येच पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात आले आहे. 3 डिसेंबरला सोमवारी सकाळी 9.30 वाजता चंद्रपूर पोस्ट ऑफिस मध्ये एका स्वतंत्र दालनात पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ झाला.
         या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहिर यांच्या सोबतच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात विदेशातील नागरिकांच्या सोयीसुविधा व पासपोर्ट संदर्भातील विभाग हाताळणारे केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे, आमदार नानाभाऊ शामकुळे,चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकरउपमहापौर अनिल फुलझेलेमाजी नगराध्यक्ष विजय राऊतपोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभायेपासपोर्ट कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक सी.एल.गौतमवरिष्ठ पोस्टमास्टर बी. हुसेन अहमदवरिष्ठ डाक अधीक्षक एस.एस.पाठक आदींसह शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          नागपूर विभागामध्ये नागपूर नंतर वर्धा येथे नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर आता चंद्रपूर येथे हे कार्यालय सुरू होत आहे. चंद्रपूर येथे सुरु होणारे हे कार्यालय भारतातील 238 वे कार्यालय आहे. विदर्भात एकूण 8 कार्यालय मिळाले आहेत. यानंतर अमरावती येथील कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. विदेश मंत्रालयाने देशातील नागरिकांना शिक्षण, उपचारपर्यटनव्यवसायासाठी जगाचे दालन खुले व्हावे यासाठी पासपोर्ट उपलब्धतेला अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे देशभरात 331 पासपोर्ट कार्यालय आतापर्यंत सुरू करण्यात आले आहे.
          यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले,केंद्रामधल्या सत्ता परिवर्तनानंतर बँकिंगपोस्टविदेश नीती या सोबतच सामान्याच्या मूलभूत गरजांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले गेले आहे. बदलत्या काळामध्ये संपूर्ण जग हे एक छोटे खेडे होत आहे. भारतातील नागरिकांना जगाच्या व्यासपीठावर उत्तम पद्धतीने आपले वर्चस्व कायम करता यावे. उद्योगव्यवसायशिक्षण,उपचार सगळ्याच क्षेत्रात जगाशी नाते जोडता यावेयासाठी मोठ्या प्रमाणात पासपोर्ट सुविधा मिळविण्याकडे या सरकारचा कल आहे. सध्या भारत पासपोर्ट उपलब्ध असणाऱ्या नागरिकांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगामध्ये यामध्ये पहिला क्रमांक नजीकच्या काळात भारत मिळवणार आहे. भारताचे विदेशी दूतावास केवळ एक कार्यालय राहिले नसून विदेशात असणार्‍या नागरिकांना आपले पहिले घर हे भारतीय दूतावास वाटत आहे. पोस्ट ऑफिसने देखील कात टाकली असून आता सगळे बँकिंगचे व्यवहारविमा व अन्य बाबी मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहेत. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा आढावा घेतला. नजीकच्या काळात रेल्वेच्या मुंबई आणि पुण्याच्या काही गाड्या लवकरच सुरू केल्या जातील,असे सूतोवाच देखील त्यांनी यावेळी केले.केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेला चंद्रपुरात आणण्याचा आपला कल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरमध्ये पासपोर्ट सेवा केन्द्र आणण्यासाठी मदत करणारे केंद्रीय सचिव ज्ञानेश्वर मुळे यांचे देखील त्यांनी कौतुक केले.
            या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली वरून खास चंद्रपूर मध्ये आलेले ज्ञानेश्वर मुळे यांनी यावेळी पासपोर्ट हे सामान्य माणसाचे पूर्वीच्या काळात काम नव्हते, असे स्पष्ट केले. मात्र परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पासपोर्ट सामान्य माणसाच्या विकासाच्या प्रगतीचे प्रवेशद्वार संबोधले आहे. त्यामुळे परदेशात नोकरी करायची असेल. उपचाराला जायचं असेल व्यवसाय करायचा असेल तर पासपोर्ट भारतातल्या सर्वसामान्य नागरिकाला तातडीने मिळावा यासाठी पासपोर्ट कार्यालयाची संख्या पोस्ट खात्याच्या मार्फत वाढवण्याचा संकल्प परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सुरू केला आहे. यासाठी कमी खर्चा मध्ये पोस्ट खात्यामार्फत एक नवे दालन उभारण्यात आले असून चंद्रपूरच्या जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा,असे त्यांनी सांगितले. देशात दर दिवशी 70 हजार लोक नवा पासपोर्ट काळात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भारतातून विदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून पासपोर्ट सारख्या सेवेला सहज उपलब्ध करून देण्याकडे केंद्र शासनाचा कल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी परराष्ट्र विभागाने विदेशात गेलेल्या नागरिकांसाठी सुरू केलेल्या सोयी -सुविधांची माहिती दिली.
         यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी देखील संबोधित केले. पासपोर्ट कार्यालय या ठिकाणी सुरू केल्याबद्दल त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे आभार मानले. चंद्रपूरच्या जनतेला एक नवी सुविधा उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. महापौर अंजलीताई घोटेकर यांनी यावेळी चद्रपूर मनपातर्फे ज्ञानेश्वर मुळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन विजय धन्दर यांनी केले.  तर आभार प्रदर्शन सी.एल.गौतम यांनी केले. 
                           पासपोर्ट काढण्याची प्रक्रीया !
            ज्यांच्याकडे पासपोर्ट नाही त्यांना पासपोर्ट काढायचाअसेल तर ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आहे. यासाठी ऑनलाईन सुविधा असणाऱ्या केंद्राची मदत घ्यावी लागते.passportindia.gov.in या साइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करणे आवश्‍यक आहे. ऑनलाइन पेमेंट झाल्यानंतर  चंद्रपूर येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सुविधा केंद्रामध्ये कधी यायचे याचा एसएमएस मोबाईलवर येतो. त्या तारखेला मूळ व झेरॉक्स प्रतींमध्ये कागदपत्रे घेऊन तपासणीसाठी जावे लागते. या ठिकाणी संगणकावर छायाचित्र घेतले जाते. तसेच बोटांचे ठसे घेतले जातात. याशिवाय आपले ऑनलाईन भरलेले कागदपत्र तपासले जातात. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी राहतात त्या हद्दीतील पोलीस स्टेशन मार्फत चारित्र पडताळणी करण्यात येते. त्यामुळे चंद्रपूर येथील कार्यालयात कागदांची तपासणीछायाचित्र व बोटांचे ठसे घेतल्यानंतर किमान पंधरा दिवसानंतर पासपोर्ट आपल्याला मिळू शकतो.
                                                          00000         

No comments:

Post a Comment