Search This Blog

Saturday, 29 December 2018

महाराष्ट्राच्या कला, संस्कृतीला वृद्धींगत करण्याचे चिंतन कला शिक्षण परिषदेत व्हावे : ना.सुधीर मुनगंटीवार



* कला शिक्षकांच्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी
      शिक्षक मंत्र्यासमवेत बैठक घेणार
    * समाजाच्या आनंदाचा जीडीपी वाढवण्याचा
                           कला शिक्षकांनी संकल्प करावा
                        * चंद्रपूरमध्ये 40 व्या कला शिक्षण परिषदेला सुरुवात

चंद्रपूर दि. 29 डिसेंबर : समाजाला आनंद देण्याची शक्ती कलेमध्ये आहे. त्यामुळे तुमच्या कलागुणांच्या माध्यमातून समाजाच्या मनाचा जीडीपी मोजता आला पाहिजे. त्यांचे पर कॅपिटा समाधान मोजता आले पाहिजे. त्यामुळे समृद्धसमाधानी महाराष्ट्र उभारण्याचे,महाराष्ट्राची कलासंस्कृती टिकविण्याचे चिंतन दोन दिवसांच्या कला शिक्षण परिषदेत झाले पाहिजे, असे आवाहन राज्याचे वित्तनियोजनवने तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
          महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे संलग्न असणाऱ्या चंद्रपूर जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने 44 व्या राज्यस्तरीय कला शिक्षण परिषदेचे आयोजन स्थानिक प्रियदर्शनी सभागृहामध्ये करण्यात आले आहे. 29 व 30 डिसेंबर या कालावधीमध्ये हे संमेलन होत आहे. सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्याहस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनांमधून महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला चालना मिळावीनव्या ध्येय - धोरणासाठी याठिकाणी चिंतन व्हावेअशी अपेक्षा व्यक्त केली. कोणत्याही प्रदेशाची ओळख त्या प्रदेशातील कलासंस्कृतीमुळे होत असते. जगाला केवळ आता कलेने जिंकता येते. त्यामुळे आपल्या प्रदेशाची ओळख ही येथील कला व कलाकारांमुळे असते. तुम्ही केलेल्या कलाकृती अजरामर राहणार असून तीच खरी कलाकाराची ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कलेची कोणतीही जात,धर्म वा कुठलाही भेदाभेद नसतो. समाजाच्या समाधानाचा उत्कर्ष कलेमध्ये असतो. त्यामुळे तो  वृद्धिंगत करणे आपल्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.
            स्वागताध्यक्ष प्रफुल्ल सावंत यांनी सुरुवातीला कला शिक्षकांच्या समस्या या व्यक्त केल्या. याबाबत आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणामध्ये ऊहापोह करताना ना.सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले. राज्य शासन हे कला शिक्षकांच्या पाठीशी असून त्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असेहीत्यांनी स्पष्ट केले.
            महाराष्ट्रमध्ये कला आणि संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये नाट्यगृह व सभागृह निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक विभागाकडून यासंदर्भात अहवाल मागून घेतला होताअसेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी  महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या नाट्यगृहांची यादीच त्यांनी कलाशिक्षकांना सांगितली.
           यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रफुल्ल सावंत यांनी संबोधित केले. महाराष्ट्राची ओळख कला संस्कृतीमुळे होत असतानासुद्धा कलाशिक्षक यांच्या नियुक्त्यांमध्ये खंड पडू नये ,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कलाशिक्षकांची मुबलक उपलब्धता व त्यांच्या सोयी सवलतीकडे लक्ष वेधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
           या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणेचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील होते. सामाजिक नेते किशोर जोरगेवारमाध्यमिक शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी महाराष्ट्रातील कला शिक्षकांच्या कला प्रदर्शनीला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
00000

No comments:

Post a Comment