Search This Blog

Sunday 2 December 2018

ध्येय निश्चिती करुन यश संपादन करा : कुंभेजकर


आदिवासी विद्यार्थ्यांच्या नव्या बॅचचा प्रारंभ

            चंद्रपूर, दि.1 डिसेंबर  चंद्रपूर येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे 3 महिने 15 दिवसाचे स्पर्धा परिक्षावर आधारीत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येत असते. याच अनुषंगाने या वर्षाच्या तिस-या सत्राचा आरंभ 1 डिसेंबर 2018 पासून सुरु झाला असून या सत्राचे उदघाटन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी ध्येय निश्चिती करुन यश संपादन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक भैयाजी येरमे, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख भाग्यश्री वाघमारे या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन तथा दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले.
               यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वत: आयएएस अधिकारी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल माहिती दिली. तसेच स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये योग्य त्या संदर्भाचे नियोजन कसे करावे आणि ध्येय निश्चित करण्यासाठी मार्ग निवडणे म्हणजे यशाच्या दिशेने जाणे होय असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच सहायक संचालक भैयाजी येरमे यांनी सुध्दा अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
               या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन भाग्यश्री वाघमारे यांनी केले तर संचालन शांताराम मडावी यांनी केले. यावेळी सर्व प्रशिक्षण घेणारी विद्यार्थी उपस्थित होते.
                                                                        000

No comments:

Post a Comment