खरेदी, विक्री, मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रम
चंद्रपूर दि.27 डिसेंबर : चंद्रपूर महानगरातील उद्योजक, व्यवसायिक व सामान्य नागरिकांच्या आवश्यकता लक्षात घेऊन लायन्स एक्सपो मेळाव्याचे आयोजन चांदा क्लब मैदानावर करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन वित्त,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी केले.
लघु उद्योजक, उद्योजक व व्यावसायिकांच्या व्यवसायाला चालना मिळावी, तसेच विविधांगी सामाजिक उपक्रमाचे समाज प्रबोधन व्हावे, यासाठी लायन्स क्लब मार्फत लायन्स एक्सपो मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी रात्री केले. यावेळी विविध शाळांतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागाबद्दल कौतुक केले. यावेळी त्यांनी या ठिकाणी लावलेल्या विविध स्टॉलला भेटी दिल्या. लायन्स क्लबने एक चांगल्या उपक्रमाची सुरुवात चंद्रपूर शहरात केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. चंद्रपूरचे आमदार नानाभाऊ शामकुळे,लायन्स क्लबचे विलास मुळे, शैलेश बागेला, अनुराधा बागेला, पल्लवी भास्करवार, प्रकाश कोटेकर, घनश्याम सिंग दरबार, आदींसह लॉयन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment