Search This Blog

Friday, 24 January 2020

पालकमंत्र्यांच्याहस्ते आज क्रीडा संकुलात
सिंथेटीक ट्रॅक बांधकामाचे भूमिपूजन
चंद्रपूर, दि. 24 जानेवारी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत स्व. दादासाहेब कन्नमवार जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे 400 मीटर सिंथेटिक धावनपथ (स्मार्ट ट्रॅक) बांधकाम करण्यात येत आहे. या सिंथेटिथ धावनपथाचे भूमिपुजन 25 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे राज्याचे मदत व पुनर्वसन, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुरेश धानोरकर तर विशेष अतिथीस्थानी जि.प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, म.न.पा. महापौर राखीताई कंचर्लावार व प्रमुख अतिथी म्हणून आमदार नागो गाणार, आ. अनिल सोले, आ. रामदास आंबटकर, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मनपा अयुक्त संजय काकडे, उपसंचालक सुभाष रेवतकर, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
या भूमिपुजन समारंभाला जास्तीतजास्त संख्येने क्रीडाप्रेमींनी उपस्थिती राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष जाधव यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment